शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार कुटुंबांचे कोरोना संसर्ग सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन -३ जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील १४ प्रभागात ...

ठळक मुद्देपुसद शहर : ७९९ नागरिक बाहेरगावाहून आले, आरोग्यविषयक माहिती केली गोळा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊन -३ जाहीर झाले. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील १४ प्रभागात तब्बल १४ हजार ७०५ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी खास ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करुन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. सर्वेक्षणात कोरोना लक्षणे असलेली एकही व्यक्ती आढळली नाही. या सर्वेक्षणात तब्बल ७९९ नागरिक बाहेरगावाहून आल्याचीही माहिती मिळाली आहे. येथील महसूल, आरोग्य, पोलीस व नगरपरिषद यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासन व प्रशासन स्तरावर विशेष दक्षता घेतली जात आहे.त्या अनुषंगाने नगरपरिषदेने ६ ते ३० एप्रिल या कालावधीत १४ प्रभागातील २९ वॉर्डातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली. शहरात एकूण २० हजार ४६० मालमत्ता असून, १४ हजार ७०५ कुटुंबे आहेत. शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. कोरोना संसर्ग सर्वेक्षण करण्यासाठी ८० कर्मचारी तैनात करण्यात आले. यात पालिकेचे शिक्षक व कर्मचारी, नागरी आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशासेविका, कर विभागातील कर्मचारी आदींचा समावेश होता.पाच-पाचच्या चमूने प्रत्येक घरी जावून घरमालकाच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. सदस्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली. त्यांच्याकडे बाहेर गावचे कोणी पाहुणे आले काय?, त्यांची माहिती घेऊन वैद्यकीय तपासणी करावयास लावणे, आदी कामे केली. कोरोनाच्या संकटात जीवाची जोखीम पत्कारून या कर्मचाºयांनी संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले. पुणे, मुंबई, दिल्ली व इतर राज्यातूल आलेल्यांची नोंद घेतली. या सर्वेक्षणाअंती एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने पुसदच्या प्रशासनाने तूर्त सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मंडई चालकांविरुद्घ पोलिसांकडे तक्रारगर्दी होऊ नये, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, या उद्देशाने फळे व भाजीपाला मंडई चालकांना मंडई बंद ठेवण्याबाबत सूचित केले होते. मात्र २४ एप्रिल रोजी ताजखाँ दाऊदखाँ, अब्दुल मुजाहिद अब्दुल कदीर व शेख रहिम यांनी सूचनेचे पालन न करता भाजीपाला लिलाव सुरु ठेवला. त्यावरुन पालिकेने पोलिसांच्या मदतीने लिलाव बंद केला. या मंडई चालकांविरुद्घ पोलिसांत तक्रार देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या