कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:43+5:30

जूनपासून गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, तर सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. या कालावधीतील अनेक दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता जून २०२१ चीच परिस्थिती पुन्हा एकदा अवतरली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६७९पर्यंत पोहोचली आहे. मात्र या काळात तब्बल ८४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

Corona covered the entire district | कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा

कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा

googlenewsNext

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन वर्षे जिल्ह्याला जेरीस आणणारा कोरोना मध्यंतरी शांत झाला. मात्र २०२२चा जानेवारी उजाडताच कोरोनाने ‘कमबॅक’ केले आहे. अवघ्या १६ दिवसांत कोरोना विषाणूने जिल्ह्यातील सोळाही तालुके पुन्हा एकदा व्यापून टाकले आहे. सुरुवातीला केवळ यवतमाळ व आजूबाजूच्या परिसरात रुग्ण आढळत होते. मात्र आता उमरखेडपासून झरीजामणीपर्यंत सर्वच तालुक्यात संसर्ग कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला.
अशी परिस्थिती जिल्ह्यात जून २०२१मध्ये यापूर्वी पहायला मिळाली होती. मात्र जूनपासून गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, तर सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. या कालावधीतील अनेक दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता जून २०२१ चीच परिस्थिती पुन्हा एकदा अवतरली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६७९पर्यंत पोहोचली आहे. मात्र या काळात तब्बल ८४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.  त्यातील ५३ जण परजिल्ह्यातील आहेत. 

यवतमाळ तिसऱ्यांदा हाॅटस्पाॅटच्या दिशेने  

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत  जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण यवतमाळ तालुका व शहरातच आढळले होते. आता तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक रुग्ण यवतमाळमध्येच आढळत आहेत. जानेवारीच्या १६ दिवसांत आढळलेल्या ८४२ रुग्णांपैकी ३७८ रुग्ण एकट्या यवतमाळातील आहेत. त्या खालोखाल पुसद, पांढरकवडा आणि नेर तालुक्याचा क्रमांक लागतो. 

५३ पाहुण्यांनी केली गडबड
जिल्ह्यात कोरोना वाढत असला तरी विविध समारंभांच्या निमित्ताने बाहेर जिल्ह्यातून पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. पंधरवड्यात तब्बल ५३ रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाहुण्यांनी कोरोना बाहेरून आणला की त्यांना यवतमाळात लागण झाली याचे ‘ट्रेसिंग’ आवश्यक आहे.

रविवारी पुन्हा आढळले १५७ नवे पाॅझिटिव्ह  
- जिल्ह्यात रविवारी १६ जानेवारी रोजी आणखी १५७ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६७९ झाली आहे. त्यातील ५७ रुग्ण रुग्णालयात तर ६२२ गृहविलगीकरणात आहेत. रविवारी प्रशासनाला प्राप्त झालेल्या ९५८ जणांच्या तपासणी अहवालांपैकी १५७ पाॅझिटिव्ह आणि ८०१ निगेटिव्ह आले.
- या १५७ जणांमध्ये ५३ महिला व १०४ पुरुष आहेत. रविवारी आर्णीमध्ये चार, दिग्रस दहा, घाटंजी पाच, कळंब १७, मारेगाव एक, नेर २०, पांढरकवडा १६, पुसद सात, राळेगाव १६, वणी सात, यवतमाळ ४२ तर झरी जामणीत दोन रुग्ण आढळले. शिवाय रविवारचे दहा रुग्ण बाहेर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर ९.२१ तर मृत्यू दर २.४२ आहे.

 

Web Title: Corona covered the entire district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.