कोरोनाने बदलल्या रूढी, परंपरा, जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:24+5:30

संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत.

Corona changed customs, traditions, lifestyles | कोरोनाने बदलल्या रूढी, परंपरा, जीवनशैली

कोरोनाने बदलल्या रूढी, परंपरा, जीवनशैली

Next
ठळक मुद्देचर्चेचे विषय बदलले : पिकपाणी, हवामानाची चर्चा पडली मागे, केवळ कोरोनाचाच उदोउदो

प्रवीण पिन्नमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोना या जागतिक महामारीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे एकत्र येऊ नये, जास्त गर्दी करू नये, यासाठी शासनाने अनेक नियम लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रूढी, परंपरा पार बदलून गेल्या आहेत.
अनेकांचे खानपान, पेहराव, सवयीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. मंदिरेही ओस पडली असून धार्मिक विधीसुद्धा बंद झाल्या आहेत. लग्नकार्येही अगदी थोडक्यात आटोपली जात आहेत.
संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत. भजन, पारायण, सप्ताहदेखील यंदा आयोजित करण्यात आले नाही. ठिकठिकाणची मंदिरेदेखील ओस पडली आहेत.
नातलगांकडून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे किंवा सहज म्हणून खुशाली विचारणारे संवाद करताना, काय म्हणते कोरोना? तुमच्या भागात प्रादूर्भाव आहे का? लॉकडाऊनची परिस्थिती कशी आहे? यासह कोरोनाविषयी इतर प्रश्न विचारले जात आहेत.
त्यामुळे कोरोना हाच विषय सर्वांच्या संभाषणचा मुख्य विषय बनला आहे. जीवन जगणाच्या पद्धतीत संवादातील शब्दरचनाही बदलू लागल्या आहेत. मुंबई, पुणे येथील पाहुण्यांना दुरूनच मोबाईलनेच खुशाली सांगत अंतर ठेवूनच संपर्क ठेवला जात आहे.

Web Title: Corona changed customs, traditions, lifestyles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.