शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या कापूस उत्पादकांची यवतमाळात अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.

ठळक मुद्देमनमानीचा आरोप : कापूस परत पाठविला जातो, उद्धट वागणूक दिली जाते, वाहतुकीचा भुर्दंड पडतो

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कापूस विक्रीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक त्रासही होत आहे. एवढेच नाही तर खराब असल्याचे कारण सांगत दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. यवतमाळ येथे खरेदी केंद्रावर अवहेलना होत असल्याची ओरड नेर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.नेरमध्ये कापूस खरेदी केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी यवतमाळ आणि दारव्हा हे दोन केंद्र देण्यात आले होते. याठिकाणची मर्यादा संपली. यानंतरही एक हजारावर शेतकरी कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातून एक हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. पण खरेदीसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.१ जुलैपासून यवतमाळ येथील केंद्रांवर नेरमधील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू झाला. मागील पाच दिवसात ४८० शेतकऱ्यांचा कापूस यवतमाळ येथील खरेदी केंद्रावर घेण्यात आला. याठिकाणी अवहेलना होत आहे. चांगला कापूसही खरेदी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वाहनातील दोन-दोन तीन-तीन क्विंटल कापूस परत केला जात आहे. कापूस खराब असल्याचे कारण सांगत हा प्रकार होत आहे. या केंद्रावर दररोज केवळ ३० गाड्या कापूस खरेदी होत आहे. संबंधित यंत्रणेकडून फोन करून गाडी मोजणीचा नंबर लागल्याची सूचना केली जाते.शेतकरी आपला संपूर्ण कापूस विक्रीसाठी यवतमाळ येथे घेऊन जातो तेव्हा त्यांना मनमानीचा अनुभव येत आहे. खरेदी केंद्रावरील कर्मचारी मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. आधीच कापूस विक्रीला उशीर झाला आहे. शेतीकामासाठी पैशाची गरज आहे. आहे तेवढा कापूस विकून यासाठी तजवीज केली जात आहे. त्यातही खरेदी केद्रांवर मनमानी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडले आहे.वणीतही विकला कापूसनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वणी येथील खरेदी केंद्र देण्यात आले होते. घरात कापूस पडून राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी ३०० किलोमीटर अंतर जाणे-येणे करून कापूस विकला. यात त्यांना प्रवास भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या पद्धतीने कापूस खरेदी करावी. यासाठी पाठपुरावा केला जात आहे.- भाऊराव ढवळे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर

टॅग्स :agricultureशेती