शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदावर काँग्रेस-राकाँचा झेंडा

By admin | Updated: September 15, 2014 00:23 IST

पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे. १५ पैकी सहा पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी चार तर

लोकमत चमू ल्ल यवतमाळ पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला आहे. १५ पैकी सहा पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी चार तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. नेर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. घाटंजीमध्ये भाजपाच्या मदतीने बंडखोर काँग्रेस उमेदवाराने सभापतीपदावर कब्जा केला. तर महागावमध्ये उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलला. यामुळे तेथील राजकारण बदलण्याचे संकेत आहे. यवतमाळ पंचायत समितीत राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम ठेवत सभापतिपद पाच सदस्यांच्या बळावर काजीब केले. विजयी उमेदवारांनी ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकी काढून विजयोत्सव साजरा केला. यवतमाळात राष्ट्रवादीचा दबदबा यवतमाळ पंचायत समितीमध्ये संख्याबळ काँग्रेसकडे सर्वाधिक असताना रविवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. सभापतीपदी तिवसा गणातील गायत्री नरसिंग ठाकूर यांची अविरोध निवड झाली. पंचायत समितीत काँग्रेस सहा, राष्ट्रवादी पाच, शिवसेना दोन आणि मनसे एक असे पक्षीय बलाबल आहे. सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले. हिवरी गणातील नारायण बाचूसिंग राठोड यांची निवड झाली. यापूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीने सभापती पद मिळविले होते. आता काँग्रेससोबत आघाडी करून वरचष्मा कायम ठेवला. सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीने यापूर्वी यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण भागात सभापतीपद दिले होते. आता विधानसभा असल्याने सभापतीपदी निवड करताना तालुक्याचा विचार करण्यात आला. शिवाय जिल्हा परिषदेतही वडगाव परिसरातूनच सभापती देण्याचे निश्चित असल्याने एकाच सर्कलमध्ये दोन पदे नको म्हणून हा सुवर्णमध्य साधला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनुप खांडे यांनी काम पाहिले. यावेळी डॉ.एस.पी. ढोले उपस्थित होते. वणी पंचायत समितीत शिवसेना वणी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सुधाकर गोरे, तर उपसभापतीपदी भाजपाच्या रुपलता निखाडे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. या दोनही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज गोरे व निखाडे बिनविरोध निवडून आल्याचे तहसीलदार रणजित भोसले व सहायक विजय मत्ते यांनी घोषित केले. मारेगाव सभापतीची निवड अविरोध मारेगाव पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. या पदासाठी एकमेव शिवसेनेच्या सुनिता मेश्राम उमेदवार होत्या. त्यामुळे त्यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे गजानन खापने आणि विद्यमान सभापती शिवसेनेच्या प्रतीभा आसुटकर यांनी अर्ज केले होते. या दोघांनाही समान दोन मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात खापने यांच्या बाजूने कौल मिळाल्याने ते उपसभापतीपदी विजयी झाल्याचे तहसीलदार डॉ.संतोष यावलीकर व सहायक नंदकिशोर कांबळे यांनी घोषित केले.