शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेची लवकरच संयुक्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांच्या सभापती -उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. कळंब व महागावातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्यावर ६ जानेवारीला सुनावणी होऊ घातली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या या निवडणुकांवर कायदेशीर अडचणींचे सावट आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी : पंचायत समित्या, जिल्हा परिषद निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढण्याचे धोरण राज्यस्तरावर निश्चित झाले आहे. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या घटक पक्षाची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांच्या सभापती -उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. कळंब व महागावातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्यावर ६ जानेवारीला सुनावणी होऊ घातली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या या निवडणुकांवर कायदेशीर अडचणींचे सावट आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ जानेवारी रोजी निश्चित झाली आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात आगामी सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय तीनही पक्षांनी घेतला आहे. तशा सूचना राज्यस्तरीय नेत्यांकडून जिल्हा स्तरावर प्राप्त झाल्या आहे. कोल्हापूर व अन्य ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. यवतमाळात जिल्हा परिषद व १६ पंचायत समितींच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात होणार आहेत. परंतु सत्तेचा फॉर्म्युला नेमका काय असेल हे अद्याप ठरलेले नाही. याच अनुषंगाने तीनही प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुढील एक-दोन दिवसात होणार असल्याचे आमदार मिर्झा यांनी सांगितले. या बैठकीत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाणार आहे.सत्तेच्या फॉर्म्युल्याकडे सर्वांच्या नजराराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी राहणार आहे. पक्षाकडून तशा सूचना आल्या आहेत. या अनुषंगाने तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये ढोबळ चर्चाही झाली आहे. लवकरच त्याबाबत ठोस व सविस्तर चर्चा होईल.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे म्हणाले, कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शनिवारी शिवसेना नेते संजय राठोड यांचे सकाळी यवतमाळात आगमन होणार आहे. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी शिवसैनिकांनी केली आहे. या स्वागतानंतर ना. संजय राठोड शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सत्तेचा फॉर्म्युला काय असेल याबाबत चर्चा होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद