शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या दिग्रस मतदारसंघात काँग्रेस पोकळ

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

दारव्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नानासाहेब देशमुख यांनी गुरुवारी येथे बैठक बोलविली होती. दिग्रस-दारव्हा-नेर या तीन तालुक्यातून काँग्रेसचे

माजी राज्यमंत्र्यांचा घरचा अहेर : निरीक्षकांपुढे केवळ शंभर कार्यकर्तेदिग्रस-दारव्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक नानासाहेब देशमुख यांनी गुरुवारी येथे बैठक बोलविली होती. दिग्रस-दारव्हा-नेर या तीन तालुक्यातून काँग्रेसचे केवळ शंभर कार्यकर्ते निरीक्षकांपुढे उपस्थित असल्याने एकूणच मतदारसंघातील पक्ष बांधणी व संघटनात्मक स्थितीची जाणीव त्यांना झाली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. काँग्रेसच्या नेत्यांचे पक्ष आणि कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघात काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पक्षाच्या या दुरावस्थेला नेते मंडळी जबाबदार आहे. पक्षात सध्या चापलूस कार्यकर्त्यांचा भरणा अधिक असून त्यांच्याकडून नेत्यांचे कान भरले जातात. त्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले आहे. प्रदेशाध्यक्षांचा मतदारसंघ असलेल्या दिग्रस-दारव्हा-नेरमध्ये काँग्रेस दिवसेंदिवस आणखी पोकळ होत चालली असल्याचे संजय देशमुख म्हणाले. यावेळी अन्य कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्याने ही बैठक चांगलीच गाजली. तोच धागा संजय देशमुख यांनी पकडल्याने कार्यकर्त्यांच्या तक्रारींना बळ मिळाले. संजय देशमुखांच्या या आक्रमक भूमिकेने काँग्रेसच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. संजय देशमुख यांना विधानसभा लढवायची आहे. गतवेळी त्यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविली होती. मात्र ते पराभूत झाले. माणिकरावांनी आपले काम केले नाही, असा त्यांचा खासगीतील नेहमीचाच सूर असतो. यावेळी त्यांनी दिग्रस सोबतच यवतमाळचाही पर्याय ठेवला आहे. मात्र माणिकराव चित्र स्पष्ट करीत नसल्याची तक्रार संजय देशमुख यांनी दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांपुढे दारव्हा येथे बोलून दाखविली. माणिकरावांप्रती मनात खदखदणाऱ्या असंतोषाला अखेर त्यांनी गुरुवारी पक्ष निरीक्षकांपुढे वाट मोकळी करून दिली.