भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:15+5:30

बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प्लांट बसविणे, एलईडी खरेदी, विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, शिलाई मशीन खरेदी, मास्क, सॅनिटायझरची खरेदी, हायमास्ट लाईट, सार्वजनिक सिमेंट बेंच बसविणे आदी कामे चार वर्षांपासून सुरू आहे.

Complaint of embezzlement in development works at Bhavani | भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार

भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंना निवेदन : ग्रामस्थांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील बंदी भागातील भवानी (रामपूर) येथे १४ व्या वित्त आयोगातून विकास कामे करण्यात आली. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प्लांट बसविणे, एलईडी खरेदी, विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, शिलाई मशीन खरेदी, मास्क, सॅनिटायझरची खरेदी, हायमास्ट लाईट, सार्वजनिक सिमेंट बेंच बसविणे आदी कामे चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ करून लाखो रुपयांचा निधी सरपंच व सचिवांनी संगनमताने लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित सरपंच व सचिवाविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भवानीचे माजी उपसरपंच रामदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य संतोष मनभे, सुदाम पवार, संतोष वानखेडे, मोहन राठोड, शेषराव राठोड, लालसिंग चव्हाण आदींसह गावकºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Complaint of embezzlement in development works at Bhavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.