शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेस फुल्ल...कॉलेज मात्र नावालाच

By admin | Updated: July 3, 2016 02:31 IST

शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोचा उपयोग सध्या सुरू आहे.

शिक्षणाचे बाजारीकरण : गुणवंत विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे केले जाते भांडवल, पालक अगतिक
पुसद : शहरातील गल्लीबोळात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करून लाखोचा उपयोग सध्या सुरू आहे. नावाजलेल्या क्लासमध्ये पाल्यांचा प्रवेश हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे पाल्याची नाव किनाऱ्यावर लागली, अशीच अनेकांची धारणा आहे. त्यामुळेच आज कॉलेजपेक्षाही क्लासेसची ‘किंमत’ वाढली असून, कॉलेज फक्त नाममात्र उरले आहेत.
आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण झपाट्याने होत आहे. दहावी, बारावीचे निकाल लागणे आणि शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशाबरोबरच क्लासेसच्या प्रवेशांची धांदल उडाली. शहरातील क्लासेसनी तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार रेकॉर्डच बनवले आहेत. अकरावी, बारावी सायन्स व सीईटीसाठी ४० हजारांपासून एक लाखांपर्यंत फी आकारली जात आहे. काही क्लासेसने विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी केवळ अकरावी किंवा बारावीच्या वर्गापुरता प्रवेश घेतला तर सीईटीसाठीही प्रवेश बंद राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजाने पाल्यांना अकरावी, बारावीसह सीईटी, असे एकत्रित पॅकेज घ्यावे लागत असून, फीदेखील एकत्रित दिल्याचे अनेकांनी सांगितले. या क्लासेसच्या वाढत्या फॅडमुळे क्लासेसमध्ये विद्यार्थी मावेनात अन् कॉलेजला विद्यार्थी मिळेना, अशी स्थिती झाली आहे.
काही महाविद्यालये व क्लासेसमध्ये साटेलोटे केले जात असून, क्लासचालक सांगतील त्याच कॉलेजात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला गेला आहे. विशेष म्हणजे, अमूक ठिकाणी प्रवेश घेतल्यास हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही सांगण्यात येते. यामध्ये पालकांना क्लासची फी व कॉलेजचे डोनेशन, असा दुहेरी बोजा सोसावा लागत आहे. खासगी क्लासेसच्या संदर्भात कोणतीही अधिकृत नोंदणी पद्धत नाही. शॉप अ‍ॅक्टचा परतावा आवश्यक असताना पुसदमधील एकाही क्लासचालकाने हा परवाना काढलेला नाही. केवळ ज्याला वाटेल तो आपल्या नावाचा बोर्ड लावून व पॉम्पलेट वाटून आपला खासगी क्लास सुरू करीत आहे. एकदा क्लास सुरू झाला की शिक्षण विभागही त्यावर प्रभावी नियंत्रण ठेऊ शकत नसल्यामुळे खासगी क्लासेसचे पेव संपूर्ण जिल्ह्याभरात फुटले आहे. पुसद शहरात गल्ली-गल्लीत कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. शाळा, महाविद्यालयात अध्यापन कार्य करणारे शिक्षकसुद्धा कोचिंग क्लास चालवित आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. क्लासेसची फी ही सर्वसामान्यांच्या आटोक्यात नाही. ‘पैसा फेको तमाशा देखो’ असाच काहीसा प्रकार कोचिंग क्लासेसमध्ये पाहावयास मिळतो, हे तितकेच खरे. (तालुका प्रतिनिधी)