शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड शहरात कडकडीत बंद

By admin | Updated: September 7, 2014 00:11 IST

गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींंना अटक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

चर्चा निष्फळ : गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेकप्रकरण उमरखेड (कुपटी) : गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींंना अटक आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी शनिवारी उमरखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान दोनही गटांंच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने वृत्त लिहिस्तोवर बंद कायम होता. २९ आॅगस्ट रोजी गणेश स्थापना मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी दोनही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शनिवारी आमदार विजय खडसे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींनी दोनही गटांची बैठक घेतली. यात कुठलाही तोडगा निघाला नाही. दोनही गटांनी आपली बाजू मांडली. यावेळी राजू जयस्वाल, नारायण भट्टड, अ‍ॅड. संंतोष जैन, डॉ. अजय नरवाडे, नितीन भुतडा, सुरेश माहेश्वरी, नंदूसेठ अग्रवाल, रमेश चव्हाण, सुनील टाक, प्रशांत पत्तेवार, शिवाजी माने, कैलास कदम, पप्पू जयस्वाल, संदीप ठाकरे, बालाजी उदावंत, विलास चव्हाण, एहजाज जनाब, रिफत अन्सारी, साजीद जागीरदार, सय्यद निसार अहेमद, मजहर टेलर, इसा राज आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयात दुपारी ३ ते ५ पर्यंत या विषयावर बैठक झाली. यात बंद मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले. यानंतरही अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी मित्र गणेश मंडळ, किसान गणेश मंडळ आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून आले. (वार्ताहर)