शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाच्या मृत्युचा तपास ‘सीआयडी’कडे

By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST

घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अमोल रामभाऊ चांदेकर (३१) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. तो घाटंजी पंचायत समिती अंतर्गत मांडवा येथे कार्यरत होता. दरम्यान शासनाच्या योजनेतून शेतकरी लाभार्थ्याची तयार झालेली विहिर मोजण्यासाठी गेला असताना २२ मार्च २०१२ ला त्याचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत स्थानिक नागरिकांना विहिरीत आढळून आले होते. अमोलच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मारहाणीच्या खुना आढळून आल्या होत्या. त्यावर अमोलचा विहिरीत पडून मृत्यू नव्हे तर खुन झाल्याचा आरोप त्याचे वडील रामभाऊ हरीभाऊ चांदेकर यांनी केला होता. मात्र घाटंजी पोलिसांनी याप्रकरणात अकस्मात घटनेची नोंद घेतली. रामभाऊ चांदेकर यांच्या तक्रारीवरून गावातीलच चार संशयितांची चौकशी पोलिसांनी केली. मात्र पुरावे न आढळल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. तपास गुंडाळल्या गेल्याने अखेर रामभाऊ चांदेकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच याचिका दाखल करून याप्रकरणाचा पुन्हा तपास केला जावा. हा तपास सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) कडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने हा तपास सीआयडीकडे सोपविण्याचे आदेश दिले. नुकताच यासंबंधीचा आदेश यवतमाळ येथील सीआयडी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यांनी तपासाची डायरी ताब्यात घेऊन बुधवारी अमरावतीला तपासणीसाठी पाठविली. (स्थानिक प्रतिनिधी)