शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

२८ कोटींच्या जलयुक्त शिवारात अनागोंदी

By admin | Updated: August 28, 2015 02:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला सुरुंग लावण्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला सुरुंग लावण्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या २८ कोटींच्या कामातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. जेसीबीची बनावट आरसी तयार करून ही कामे लाटली आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने जलयुक्त शिवारची कामे वाटपासाठी जिल्ह्यातील जेसीबी मशीनधारकांची नोंदणी केली. यात सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. सत्ताधारीच नव्हेतर विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा स्वत:च्या नावने काम घेतले आहे. जवळपास पाचशेच्यावर जेसीबी मशीनची नोंदणी करण्यात आली. शेवटी-शेवटी तर बॅक डेटचा आधार घेऊनही मशीनची नोंदणी केली गेली. जेसीबी मशीन नोंदणी करताना चक्क खोटे आरसी बुक जोडण्यात आले आहे. त्यानंतर ३१ मार्च पूर्वीच अतिशय घाई गडबडीत ही कामे वितरित करण्यात आली. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेट कामाचे वाटप करण्यात आले. त्यातून सर्वच मालामाल झाले आहे. यासाठी बोगस आरसी बुकचा आधार घेतल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने याचा शोध घेतला असता, अनेक धक्कादायक बाब पुढे आल्या आहेत. कोणत्याही वाहनाचा नंबर घेऊन थेट उपविभागीय परिवहन अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर करून आरसी बुक तयार करण्यात आले आहे. तीन कंत्राटदारांनी अशा पद्धतीने खोटे दस्ताऐवज देऊन काम लाटले आहे. या महाभागांनी चक्क परिवहन अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या व शिक्का तयार केला आहे. तसेच त्याच बनावट आरसी बुकच्या सहाय्याने विमासुद्धा काढला आहे. पुसद येथील एक संस्थानिकाकडे असलेल्या होन्डा सिटी कारचा क्रमांक एमएच २९ एके ००२९ याचा वापर करून यवतमाळातील एका महाभागाने जेसीबीचे आरसी बुक तयार केले आहे. याप्रमाणेच नांदेड येथे विकलेल्या जेसीबीची सुद्धा खोटी आरसी तयार करून नेर तालुक्यातील एका कंत्राटदाराने एमएच २९ एके ३० क्रमांकाच्या आरसीवर काम घेतले आहे. यावरही कळस म्हणजे एमएच २२ एबी ९८११ या क्रमांकाची आरसी चक्क यवतमाळातील उपपरिवहन अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरी व शिक्क्याचा वापर करून तयार केली. हा प्रताप पुसद येथील महाठगाने केला आहे. खोट्या आरसी बुकवर काम लाटण्यासाठी थेट कृषी विभागातूनच या भामट्यांना मदत करण्यात आली. यादीतील ज्येष्ठता डावलत या कंत्राटदारांना काम देण्यासाठी एकात्मिक पाणलोट व्यस्थापन समितीचे ठराव घेण्यात आले. यासाठी कृषी विभागातील फितुरांनी विशेष परिश्रम घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)