शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी विदर्भा नदीत

By admin | Updated: August 4, 2014 23:59 IST

आहे़ या खाणींमधून कोळशाबरोबर निघणारे दूषित व रसायनयुक्त

वेकोलिची मनमानी : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातवणी : तालुक्यातील घोन्सा परिसरात वेकोलिच्या दोन कोळसा खाणी आहेत़ यात घोन्सा खुली खाण व कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण आहे़ या खाणींमधून कोळशाबरोबर निघणारे दूषित व रसायनयुक्त पाणी सरळ परिसरातून वाहणाऱ्या विदर्भा नदीत सोडले जात आहे़कुंभारखणी ही भूमिगत कोळसा खाण आहे़ या खाणीमधून कोळसा बाहेर काढताना त्यामधून निघणारे दूषित पाणी विदर्भा नदीत सोडले जात आहे. पूर्वी हे पाणी घोन्साजवळ असलेल्या एका शेतात शुध्दीकरण यंत्रातून शुध्द केल्यानंतर नदीत सोडले जात होते़ परंतु ते आता शुध्द न करताच काळे पाणी सरळ नदीत सोडले जात आहे़ त्यामुळे नदीतील संपूर्ण पाणी काळेभोर झाले आहे. वेकोलिच्या या मनमानी कारभाराला परिसरातील ग्रामस्थ चांगलेच कंटाळले आहे. विदर्भा नदीतून परिसरातील घोन्सा, बोर्डा, साखरा (दरा) आदी गावांना पाणी पुरवठा होतो़ हे दूषित झालेले पाणीच सरळ नळावाटे बाहेर येत आहे. काही ठिकाणी तर नळाला अत्यंत काळे पाणी येते, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे़ याविषयी गावकऱ्यांनी तक्रारीसुध्दा केल्या़ परंतु वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही़ त्यामुळे सध्या परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ या दूषित पाण्यामुळे काही गावांमध्ये ग्रामस्थांना मळमळ, उलटी, हगवण यासारखे आजार वाढत आहे़ मानवी आरोग्याबरोबर जनावरांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे़ हे काळे पाणी जनावरांच्या शरीरात गेल्यास त्यांचे आरोग्य संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे़ या सर्व प्रकारामुळे मानव व जनावरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. त्यावर तातडीने उपयायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)