छायाचित्र प्रदर्शनात चंद्रपूर प्रथम

By Admin | Updated: August 18, 2015 02:44 IST2015-08-18T02:44:19+5:302015-08-18T02:44:19+5:30

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॉटन सिटी फोटोग्राफर क्लबच्यावतीने येथील भावे मंगल कार्यालयात तिसऱ्या

Chandrapur first with a photo display | छायाचित्र प्रदर्शनात चंद्रपूर प्रथम

छायाचित्र प्रदर्शनात चंद्रपूर प्रथम

यवतमाळ : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॉटन सिटी फोटोग्राफर क्लबच्यावतीने येथील भावे मंगल कार्यालयात तिसऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सदर प्रदर्शन १९ आॅगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या छायाचित्र प्रदर्शनात राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांचा यात समावेश होता. महिला छायाचित्रकारांचा सहभाग लक्षणीय राहिला. व्यावसायिक गटात चंद्रपूर येथील देवानंद साखरकर यांच्या छायाचित्राला २१ हजार रुपयांचा पहिला पुरस्कार मिळाला. नागपूर येथील श्रेया गुप्ता ही १५ हजार रुपयांच्या द्वितीय बक्षिसाची मानकरी ठरली. हिंगोली येथील प्रवीण देगावकर याला १० हजारांचा तृतीय पुरस्कार देण्यात आला. एक हजारांचे प्रोत्साहनपर पाच बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये अमरावती येथील वैभव दलाल, विक्रम दलाल आणि चंद्रपूर येथील गोलू बारहाते यांचा समावेश आहे.
हौशी गटामध्ये वर्धा येथील गणेश शेंडे याला १० हजारांचे पहिले बक्षीस, वर्धा येथील तन्मय ठाकरे यांना सात हजारांचे दुसरे तर यवतमाळ येथील करण मून जीवन यांना पाच हजारांचे तिसरे बक्षीस देण्यात आले. प्रत्येकी एक हजारांचे पाच प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये यवतमाळ येथील विश्वेष दहिवलकर, हिमांशू पाटेकर, चंद्रपूर येथील रोहित बेलसरे, यवतमाळ येथील हरिओम काळे, हरिष जैन यांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पराग पिंगळे, अनिल दंडे, किशोर इंगळे, संजय रंगे, प्रवीण निमोदिया, जिज्ञेस राणिंगा, प्रा. व्ही.आर. साकरेकर, प्रा. व्ही.आर. घुरडे, प्रा. पी.डी.गावंडे, संघटनेचे अध्यक्ष महेश बुरडकर, सचिव अभय वडगिरे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Chandrapur first with a photo display