शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अडगळीतील कॅरम बोर्ड निघाला बाहेर, अंताक्षरीही रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला. प्रशासनाने पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सर्वत्र कलम १४४ लागू केल्याने संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने घरात थांबून आहे.

ठळक मुद्देमुलांमध्ये रमण्याची संधी : आई-बाबांचा संघ बनवून मुलांनी लुटला खेळाचा आनंद, घरगुती स्पर्धेतील विजेत्याला हातच्या खाऊचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सण-उत्सव व इतर सुटीच्या दिवसातही कुटुंबात रममान न होणारे आई-वडील आज खऱ्या अर्थाने मुलांसोबत मुल बनून खेळले. कित्येक वर्षांपासून घराच्या अडगळीत असलेला कॅरम बोर्ड, अष्ठचंग, अंताक्षरी रंगली. मुलांनी आईला तर मुलींनी वडिलांना आपल्या संघात घेऊन या घरगुती खेळाचा मनमुराद आनंद लुटला. बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही.पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला.प्रशासनाने पुढील काही दिवस घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सर्वत्र कलम १४४ लागू केल्याने संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने घरात थांबून आहे.मिळालेल्या सुटीचा कुटुंबासोबत आनंद लुटणे नागरिक व्यस्त आहेत. काही ठिकाणी आजी-आजोबा, काका यांच्यासोबतही वेळ घालविण्यात आला. गप्पांमधून ज्येष्ठांनी आपले बालपण मुलांना सांगितले.१) अ‍ॅड. मनीष माहूरकर यांनी मुलांसोबत कॅरमचा आनंद घेतला.२) प्रमोद निळे यांच्या घरी लुडोचा खेळ तर कॅशिओवर अंताक्षरी.३) माणिक जाधव कुटुंबातील मुलींनी आईला अशी मदत केली.ही तर खरी संधीजनता कर्फ्यू या संकल्पनेमुळे घरात रममान होण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही कारणाने का असो ना कुटुंबातील संवाद कमी झाला होता. स्वत:चे आई-वडील, मुले यांच्यातही तितकी एकरुपता नव्हती. आता पूर्णवेळ घरात घालवायचा असल्याने सफाईच्या कामाला पुरुष मंडळींनीही हात घातला. मुलेही मदतीला धावून आली. काही मिनिटाच घराचा कानाकोपरा चकाचक झाला. विविध खेळ झाले. बºयाच दिवसांनी आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा मिळाला, अशी प्रतिक्रिया विविध कुटुंबातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक