शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी मिळविण्यासाठी बसस्थानकात धुमाकूळ

By admin | Updated: October 14, 2016 03:08 IST

पुसद बसस्थानकातून प्रवासी ओढून नेण्यासाठी अवैध आॅटो चालक व ट्रॅव्हल्स चालक बसस्थानकात शिरकाव करीत असून या गंभीर प्रकारामुळे महामंडळ कमालीचे हतबल झाले आहे.

महामंडळ हतबल : पोलिसात तक्रार करूनही मुजोरी कायमपुसद : पुसद बसस्थानकातून प्रवासी ओढून नेण्यासाठी अवैध आॅटो चालक व ट्रॅव्हल्स चालक बसस्थानकात शिरकाव करीत असून या गंभीर प्रकारामुळे महामंडळ कमालीचे हतबल झाले आहे. या प्रकाराबाबत महामंडळाने यापूर्वीच पोलिसात तक्रारही केली आहे.पुसद बसस्थानकात दररोज बाहेरगावावरून प्रवासी ये-जा करीत असतात. या बसस्थानकात बस फलाटावर लागेपर्यंत प्रवासी बसून असतात. याचाच लाभ उचलत काही आॅटोचालक बसस्थानकात प्रवेश करून आपले वाहन उभे करतात. त्यानंतर ते प्रवाशांना बसमधून किंवा फलाटावरून आपल्याकडे बोलावतात. नंतर ते प्रवाशांना आॅटोने गावाकडे नेतात. तसेच काही खासगी ट्रॅव्हल्सवालेही प्रवाशांना बोलावून नेत असल्याचे समजते. याबाबत अनेकदा महामंडळाने या अवैध वाहन चालकांना सूचनाही दिल्याची माहिती आहे. मात्र तरीही मुजोरीने आॅटोचालक बसस्थानकात प्रवेश करतात. मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात एक नव्हे तर अनेक चारचाकी खासगी वाहने सकाळपासून दुपार व रात्रीपर्यंत उभेच असल्याचे बघावयास मिळत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळ एकीकडे आपल्या उत्पन्नात कशी भर पडेल, याकडे लक्ष देत असतना दुसरीकडे अवैध प्रवासी वाहने महामंडळाच्या या उद्देशाला छेद देत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथे जाण्यासाठी बसस्थानकाच्या समोरील भागातील उजव्या बाजूस ट्रॅव्हल्सही उभ्या असतात. त्यांच्याकडून दोनशे मीटर अंतराच्या नियमाचे पालन होते की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. या ट्रॅव्हल्समधील क्लिनर व चालक बसस्थानकात प्रवेश करतात. यवतमाळ फलाटावर येऊन ते प्रवाशांना यवतमाळला कमी तिकीटात नेतो, असे सांगत असतात. काही प्रवासी त्यांच्या आमिषाला बळी पडून या ट्रॅव्हल्सने जातात. हा प्रकार नेहमीच बसचालक, वाहक व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडतो. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी अनेकदा या अवैध वाहन चालकांना हटविल्यानंतरही ते पुन्हा मुजोरीने बसस्थानकात प्रवेश करतात. त्यांची अरेवारी वाढत चालली असल्याचे कर्मचारी खासगीत बोलतात. या बसस्थानकात स्वतंत्र पोलीस चौकी आहे, परंतु चौकीत पोलीस मात्र अभावानेच प्रवाशांना दिसतो. पोलीस व कर्मचाऱ्यांच्या नजरेआड बसस्थानकाकडून प्रवासी नेण्याचा प्रकार अद्यापही सुरूच आहे. काही आॅटोचालक आपला आॅटो बसस्थानकासमोर असलेल्या किंवा दुसऱ्या एखाद्या पॉर्इंटवर नेऊन उभा करतात. त्यानंतर बसस्थानकात येऊन प्रवाशांना त्यांच्या मागे-मागे येण्यास सांगतात. आॅटोचालक आता लपून-छपून प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेर बोलावित आहेत. तर काही आॅटोचालक प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करीत असल्याचे दिसते. सोबतच बसस्थानकात दुचाकीस्वारांचीही मोठी धूम असते. (प्रतिनिधी)महाविद्यालयीन विद्यार्थिनींना होतोय त्रास शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी दररोज बसने ये-जा करतात. विद्यार्थिनींसमोर फ्लॅश मारण्यासाठी अनेक दुचाकीस्वार आपली दुचाकी बसस्थानकात नेतात. त्यामुळे बसस्थानकातील प्रसाधनगृहाजवळ नेहमी केवळ वाहनांचीच रांग दिसून येते. प्रवाशांच्या वाहनांची गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र काही दुचाकी चालक तेथे वाहन न ठेवता बसस्थानकाच्या कोणत्याही परिसरात आपली वाहने उभी करतात. या दुचाकींमुळे एसटीबसला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.