दोघांचा मृत्यू, ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:10+5:30

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन वार्डात १३० जण दाखल असून उपचार घेत आहे. आतापर्यंत २० हजार ७८१ नमुने तपासणीसाठी पाठविले गेले.

Both died, 56 new positive patients | दोघांचा मृत्यू, ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

दोघांचा मृत्यू, ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोना उद्रेक : ८० जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायमच असून मंगळवारी आणखी दोघांचा या आजाराने मृत्यू झाला. शिवाय ५६ नव्या रुग्णांचीही भर पडली.
पाटीपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्याच्या फुलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूने जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींचा आकडा ३७ वर पोहोचला आहे. मंगळवारी ५६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामध्ये पुसद तालुक्यातील पाच, दिग्रस १९, पांढरकवडा २, यवतमाळ ६, उमरखेड शहरातील १७, आर्णी ५ तर नेर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनावर मात केल्याने ८० रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४० झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या एक हजार २८४ झाली असून त्यातील ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत आयसालेशन वार्डात १३० जण दाखल असून उपचार घेत आहे. आतापर्यंत २० हजार ७८१ नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्यापैकी चार हजार २३९ नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. अ‍ॅन्टीजन किटच्या माध्यमातून आणखी तत्काळ अहवाल मिळणार आहे.

दर्डानगर, संभाजीनगरात कोरोना रुग्ण
मंगळवारी यवतमाळ शहरातील सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. त्यामध्ये दर्डानगर, संभाजीनगर, आंबेडकर चौक, काळे ले-आऊट, कमला पार्क येथील महिला व पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक २२६ रुग्ण
जिल्ह्यात सर्वाधिक २२६ रुग्णांची नोंद एकट्या यवतमाळ तालुक्यात झाली आहे. त्यात सात मृत्यू व ३१ पॉझिटिव्ह आहेत. त्या खालोखाल केळापूर १९५, पुसद १९९, दिग्रस १६६ तर दारव्हा तालुक्यातील ७३ रुग्णांची नोंद झाली. तेथे अनुक्रमे दोन, पाच, दोन, सहा एवढे मृत्यू नोंदविले गेले आहे. बाभूळगाव तालुक्यात मात्र अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद शासन दप्तरी नाही.

Web Title: Both died, 56 new positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.