शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दारूड्या पतीचा मुलांच्या मदतीने खून

By admin | Updated: June 3, 2016 02:32 IST

दारूड्या पतीच्या असह्य त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना

वरझडीची घटना : पत्नीसह दोन मुलांना अटक वणी : दारूड्या पतीच्या असह्य त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना तालुक्यातील वरझडी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी पत्नीसह दोन मुलांना अटक केली आहे.बापूराव आदे (४५) रा. वरझडी असे मृताचे नाव आहे. तर पत्नी वृंदा बापूराव आदे, मुलगा साजन बापूराव आदे (२४), मुलगी रोशनी बापूराव आदे (२१) असे आरोपींचे नावे आहेत. बापूराव आदे आपल्या परिवारासह वरझडी येथे राहत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारू प्राशन करून तो पत्नी वृंदाला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच दारूच्या नशेत बापूराव पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. यावरून या दोघात नेहमी खटके उडत होते. मुले मोठी असल्याने त्यांच्या समोर बापूराव वृंदाला नेहमी त्रास देत होता. त्यामुळे तिचा संयम ढळला. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बापुराव नेहमीप्रमाणे दारू प्राशन करून घरी आला. त्याने भांडण सुरू करून चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. यात दोघात चांगलाच वाद सुरू झाला. याच वादात रागाच्या भरात वृंदाने लोखंडी रॉड हाती घेऊन बापुराववर प्रहार केला. तिला साजन व रोशनी या दोन मुलांनी सहकार्य केल्याचा आरोप आहे. रॉड वर्मी लागल्याने बापुराव गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच वृंदा आदे साजन आदे, रोशनी आदे या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती. वरझडी येथे घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास शिरपूर पोलीस करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)