शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार, शिवसेना जिल्हाध्यक्षात झाली बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद साधत होते. याचवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप कोणत्या सरकारचे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात  तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी बाचाबाची झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद साधत होते. याचवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप कोणत्या सरकारचे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला. आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, विश्वास नांदेकर हे थेट आमदार बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तिथे उपस्थित पोलिसांनी या वादात मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. त्यानंतर आंदोलन स्थळावरील तणाव निवळला. 

मी आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी विश्वास नांदेकर शेतकऱ्यांशी बोलत होते. मी ही त्याठिकाणी पोहोचलो. याप्रकरणी काय होऊ शकते, याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना वादाला सुरूवात झाली. नांदेकर हे फडणवीस सरकारला दोषी ठरवत होते. वास्तविक धरणाची मंजुरी काॅंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला. - संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी

मी हटवांजरी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना आमदार बोदकुरवार त्या ठिकाणी आले. मी सन्मानपूर्वक त्यांना बसायला जागा दिली. दोघेही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना बोदकुरवार यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून आमच्यात वाद झाला. राज्यातील ठाकरे सरकारवर अकारण टीका करणे आम्ही सहन करणार नाही.- विश्वास नांदेकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना