शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महागावात भाजपाला कुबड्याचा आधार

By admin | Updated: October 12, 2015 02:39 IST

नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे.

नगरपंचायत : निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर, राजकीय वातावरण तापलेमहागाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नऊ महिन्यातच भाजपाची वाताहत सुरू झाली आहे. शिस्तीमध्ये असलेला पक्ष आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला कुबड्याचा आधार घ्यावा लागत आहे.महागाव नगरपंचायतीसाठी नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. उमेदवारांवर दबाव आणून त्यांना नामांकन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भाजपही यात आघाडीवर दिसत आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपात गेले नसले तरी भाजपाच्या बुडत्या जहाजाला दिशा देण्याचे काम ते पडद्याआड करीत आहे. त्यामुळे भाजपाला नदी पार करण्याचा आनंद वाटत असला तरी भाजपाच्या नावेला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता छिद्र पाडणे सुरू केले आहे.काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष अशा सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत दुखावल्या गेले आहे. पक्षात सुरू असलेला तिकिट वाटपाचा खेळ भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनाही माहीत आहे. खरी गोम ही आहे की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अल्पकाळात विद्यमान आमदाराने मतदारांची वचनपूर्ती केली नाही. त्याचा आता नगरपंचायत निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. जनतेच्या दारावर मते मागायला जायचे कसे, असा प्रश्न सुरू आहे.गेल्या १० महिन्यात महागावत कोणतेही विकासाचे काम आणले नाही. निवडणुकीच्या तोंडावर २५ लाख रुपयांची कामे देण्याचा केलेला वादा आणि शहरातील रस्त्यांचे घेतलेले मोजमाप किती खोटारडेपणाचे होते, याची वाच्यता होतानाच आचारसंहिता लागली. आता मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जावे म्हणून भाजपाची सूत्रे पडद्याआड काँग्रेस नेत्याच्या हाती दिली आहे. विद्यमान आमदारांनी जनसंपर्कही कमी केला आहे. महागाव, फुलसावंगी आणि उमरखेडमधून आमदारांचे घनिष्ठ होते तेही आता दूर झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या काळात विकासाला टक्केवारीचे ग्रहण लागले होते. त्यापलिकडे जावून सध्या अधिक टक्केवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम भाजपाला नगरपंचायत निवडणुकीत सोसावा लागेल, हे कुणाला सांगणे न लागे. (शहर प्रतिनिधी)