Birth Welfare Festival by Jain Sangh | जैन संघटनेतर्फे जन्मकल्याणक महोत्सव
जैन संघटनेतर्फे जन्मकल्याणक महोत्सव

ठळक मुद्देभगवान महावीर जयंती : माळीपुरातून प्रभात यात्रा, अहिंसा संदेश रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण विश्वाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे चोविसवे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन १७ एप्रिल रोजी येथे करण्यात आले आहे. भारतीय जैन संघटना यवतमाळ शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
माळीपुराभागातील दिगंबर जैन मंदिर येथून सकाळी ६.३० वाजता प्रभातयात्रा काढली जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजता मंगल ध्वजारोहण आणि ध्वजवंदन होईल. ९.३० वाजता जैन युवकांतर्फे मोटरसायकल रॅली काढली जाईल. यामाध्यमातून अहिंसा संदेश दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालयात रुग्णांना के.सी. बरलोटा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फळ आणि बिस्कीटांचे वाटप होणार आहे. ट्रस्ट आणि जैन संघटनेतर्फे पेप स्मियर टेस्ट (महिलांच्या गर्भाशयातील पेशींची तपासणी) शिबिर बरलोटा नर्सिंग होममध्ये होईल.
सृष्टी आदिवासी आश्रमशाळा आणि पिंपळगाव येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ वाजता विविध साहित्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी ललित कोठडीया, तिलक गुगलीया, प्रमोद मुथा, महेंद्र बोरा, सुशील कटारिया आदी आहेत.
या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अ‍ॅड. संजय कोचर, नंदू टोपरे, उमेश बैद, संदीप कोचर, नंदू बदनोरे, अ‍ॅड. रुपेश मुणोत, श्याम भंसाली, कस्तुरचंद सेठिया, रवींद्र बोरा, आदेश लुणावत, राजेश गुगलीया, संतोष कोचर, संजय बोथरा, राहुल चोपडा, चेतन पारेख, अनिल ओसवाल, ललीत कोठडिया, मयूर मुथा, डॉ. रमेश खिवसरा, संजय झांबड, अशोक कोठारी, प्रवीण बोरा, राजेंद्र गेलडा, गौतम खाबिया, अ‍ॅड. संजय सिसोदिया, प्रमोद छाजेड, महावीर कोचर आदींनी केले आहे.
जैन धर्म स्थानकात प्रवचन
जैन इतिहासचंद्रिका महासती डॉ.विजयश्रीजी म.सा. (आर्या) आणि प्रवचन प्रभाविका महासती तरूलताश्रीजी म.सा. आदिठाणा २ यांचे प्रवचन येथील राजेंद्रनगरातील मावजी देवजी निसर जैन धर्म स्थानकात होणार आहे. सकाळी ८ ते ९ या वेळात प्रवचन होणार आहे. याचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.


Web Title: Birth Welfare Festival by Jain Sangh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.