शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या प्रगतीत जैवतंत्रज्ञान महत्त्वाचे

By admin | Updated: April 20, 2015 00:10 IST

जैवतंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेतकरी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीची पायाभरणी यवतमाळ : जैवतंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेतकरी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे. यवतमाळ येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची पायाभरणी कृषी विकास दर वाढविण्यासाठी मोलाची ठरेल, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वाघापूर रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीची पायाभरणी रविवारी दुपारी मुनगंटीवार यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय राठोड, आमदार मनोहरराव नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक ऊईके, प्रा. राजू तोडसाम, राजू नजरधने, संजीवरेड्डी बोदकुरवार, ख्वाजा बेग, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नितीन हिवसे, कृषी अधिष्ठाता डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. प्रदिप इंगोल, विद्यापीठ अभियंता दिलीप महल्ले उपस्थित होते. कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील शेतीशी निगडीत तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी या महाविद्यालयाने मोलाची भुमिका बजावावी, असे वित्तमंत्री म्हणाले. शासन देशी बियाण्यांची बँक तयार करीत असून, त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सर्वच प्रकारे मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता राजेंद्र गाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर, डॉ. एन.डी. पालार्वार, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)