तिवरीत शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून

By Admin | Updated: June 4, 2017 01:09 IST2017-06-04T01:09:15+5:302017-06-04T01:09:15+5:30

तालुक्यातील तिवरी येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार हत्याराने खून केला.

The big brother's murder in the matter of farming | तिवरीत शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून

तिवरीत शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील तिवरी येथे शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार हत्याराने खून केला. भावजयीवरही हल्ला करून तिला जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
रमेश हरसिंग पवार (४५), असे मृताचे नाव आहे. रमेश पवार आणि त्यांचा लहान भाऊ विलास हरसिंग पवार (३८) यांच्यात दोन एकर शेतीचा वाद होता. शुक्रवारी रात्री पुन्हा शेतीवरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रमेशला शिवीगाळ करीत लहान भाऊ विलास त्यांच्या अंगावर धावून गेला. रमेशची पत्नी सविता मधात आली असता तिला विलासने मारहाण करीत ढकलून दिले. नंतर विलासने घरातील धारधार हत्यार आणून अंगणात उभ्या असलेल्या रमेशला खाली पाडून त्याच्यावर सपासप वार केले.
यात रमेश पवार जागीच ठार झाला. नंतर विलास तेथून पळून गेला. याप्रकरणी मृत रमेश पवार यांची बहीण संतूबाई अजाबराव राठोड यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी सकाळी १० वाजता आरोपी विलास पवार याला साखरा शिवारातून अटक केली. तत्पूर्वी घटनास्थळाला दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. ललित पांडे, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे आदींनी भेट दिली.

Web Title: The big brother's murder in the matter of farming