शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वणीतील पथकाचे प्रमुख श्रीकांत जिंदमवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या टोळीचा माग काढला. उमेश मडावी रा. वणी हा साथीदारांसह चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्दे१८ लाखांचा मुद्देमाल : वणी परिसरातील बहुतांश घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक मोबाईल कंपन्यांचे जंगलात, शेतात मोबाईल टॉवर आहे. या ठिकाणी बॅकअपसाठी महागड्या बॅटरींचा वापर केला जातो. चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या वणीतील पथकाचे प्रमुख श्रीकांत जिंदमवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या टोळीचा माग काढला. उमेश मडावी रा. वणी हा साथीदारांसह चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून चारगाव चौकी परिसरात सापळा रचून या आरोपींना पकडले. त्यांच्याजवळ मोठे ट्रॅव्हलर वाहन होते. त्यामध्ये १२ बॅटऱ्या ६० हजार रुपये किंमतीच्या मिळाल्या. तत्काळ उमेश उत्तम मडावी रा. खरबडा मोहल्ला वणी, शिवा पांडुरंग गुरनुले रा. चिखलगाव, मारोती केशव मांदाडे रा. चिखलगाव यांना ताब्यात घेतले. या तिघांनी वडकी, आर्णी, घाटंजी, पारवा, मुकुटबन, पाटण, वणी येथून मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. या बॅटºयांची खरेदी सलमान खान अमिरोद्दीन खान, मोहंमद आदिल खान मोमीन खान रा. मेरठ उत्तरप्रदेश यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याजवळून चंद्रपूर येथून ३५ बॅटऱ्या जप्त केल्या. अभय सुधाकर पचारे रा. वणी हा सुद्धा आरोपींसोबत चोरीचे काम करीत होता. या सर्व आरोपींकडून १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कामगिरी एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, सुनील पाळेकर, किशोर झेंडेकर, पंकज बेले, प्रवीण कुथे यांनी केली.अशी आहे चोरीची पद्धतमोबाईल टॉवरची दुचाकीवरून दोघे जण रेकी करीत होते. नंतर टॉवर परिसरात येणाºया प्रमुख रस्त्यावर दोघे जण पाळत ठेऊन राहत होते. याच कालावधीत चारचाकी वाहन घेऊन बॅटºया काढून घेतल्या जात होत्या. या दरम्यान प्रत्यक्ष पाळत ठेवणारे व चोरी करणारे यांच्यात संपर्क होत होता. यावरूनच पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. बॅटरी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Thiefचोर