शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ओरिसा येथून आले बॅग लिफ्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आहे. ओरिसातून रेल्वेने दुचाकी घेऊन नागपुरात दाखल झाले.

ठळक मुद्देदुचाकीही आणली : यवतमाळ, अमरावती, वर्धेत केले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकेच्या समोर पाळत ठेऊन पाठलाग करायचा, नंतर संधी मिळताच त्याची बॅग हिसकावून पोबारा करायचा ही गुन्ह्याची पद्धत. थेट ओरिसातून नागपूरमार्गे यवतमाळ जिल्हा गाठला. विदर्भातील अमरावती, वर्धा या जिल्ह्यातही बॅग लिफ्टींगचे गुन्हे केल्याची कबुली या आरोपींनी दिली. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेनंतर वडकी पोलिसांनी या बॅग लिफ्टरला सिनेस्टाईल पकडले. आता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आहे. ओरिसातून रेल्वेने दुचाकी घेऊन नागपुरात दाखल झाले. ३० आॅक्टोबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यवतमाळातील सहकारनगरमध्ये १ नोव्हेंबरला सुधा काठोके या महिलेची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली. हे दोन्ही आरोपी बँकेच्या परिसरात पाळत ठेऊन असतात. महिला किंवा वृद्ध पैसे घेण्यासाठी आला व बाहेर पडताच त्याचा पाठलाग सुरू करतात. सुधा काठोके या महिलेची बॅग याच पद्धतीने लंपास केली. हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाले. मात्र राज्याबाहेरचे आरोपी असल्याने पोलीस रेकॉर्डवर त्याची कुठलीही नोंद नाही. याचाच फायदा हे आरोपी घेत होते. त्यांंनी अमरावती शहरात, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे गुन्हे केले आहेत. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅग लिफ्टींगचे गुन्हे केले. मारेगाव येथे शेतकºयाची ५० हजार रुपयांची रोख असलेली बॅग या चोरट्यांनी लंपास केली. वडकी पोलिसांंनी आष्टोना फाट्याजवळ चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडले.

टॅग्स :Thiefचोर