पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:00 AM2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:04+5:30

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी काढली जाईल असा अंदाज आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पहिली यादी जारी करण्यात आली होती. परंतु त्यात एकाच ठिकाणी दोन वर्ष पूर्ण न होणे या कारणामुळे जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी बदलच करता आले नव्हते. आता सामान्य बदल्यांच्यावेळी हे बदल होण्याची शक्यता आहे.

Awaiting appointments to police officers | पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्यांची प्रतीक्षा

पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्यांची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देआचारसंहिता संपण्याकडे नजरा : नियंत्रण कक्षातील गर्दी कमी करणार

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी जारी होण्याची पोलीस अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यात सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांची संख्या अधिक राहणार असल्याचे सांगितले जाते. 
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी काढली जाईल असा अंदाज आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पहिली यादी जारी करण्यात आली होती. परंतु त्यात एकाच ठिकाणी दोन वर्ष पूर्ण न होणे या कारणामुळे जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी बदलच करता आले नव्हते. आता सामान्य बदल्यांच्यावेळी हे बदल होण्याची शक्यता आहे. तर काही अधिकाऱ्यांना दोन वर्ष पूर्ण होण्यास अवघे एक-दोन महिने बाकी असल्याने त्यांना आताच हलविले जाण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. परंतु दुसऱ्या यादीत काही एपीआय आणि बहुतांश फौजदारांचा समावेश राहणार आहे. 
नियंत्रण कक्षात सुमारे डझनभर पोलीस अधिकारी तैनात आहेत. त्यांना बाहेर काढले जावून विविध पोलीस ठाणे, शाखांमध्ये नेमले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुसऱ्या यादीत महत्वाच्या ठाण्यांमध्ये खांदेपालट केली जात का याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही सोईच्या ठिकाणी जाण्यासाठी काही इच्छुकांनी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी केल्याचेही बोलले जाते. 
पीआय, एपीआय, पीएसआय पैकी कुणाला कुठे नेमणूक मिळते, कोण कुठे वर्णी लावून घेण्यात यशस्वी होताे, हे पाहणे महत्वाचे ठरते. जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, यवतमाळ ग्रामीण या सारखे काही पोलीस ठाणे सध्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात आहेत. तेथे पोलीस निरीक्षक दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Awaiting appointments to police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस