शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हजेरी अहवालास शाळांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

ऑनलाईन अहवाल मिळावा यासाठी राज्यस्तरावरून शिक्षकांपर्यंत लिंक पाठविण्यात आल्या आहे. बहुतांश शिक्षक ही लिंक रोज भरतही आहेत. परंतु या रोजच्या अहवालांपासून खुद्द जिल्हास्तरीय यंत्रणाच बाजूला ठेवण्यात आली. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किंवा नगरपालिकांचे शिक्षण प्रशासन अधिकारी असा अहवाल मागविण्यातच येत नसल्याचा दावा करीत आहे. 

ठळक मुद्देउपस्थितीचे प्रमाण मात्र वाढले : बाभूळगावात सर्वाधिक ८३ टक्के हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शाळेतील ‘हजेरी’ हा काही विद्यार्थ्यांसाठी मजेचा तर काही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक भाग असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू केल्याने खुद्द शासनच दररोज प्रत्येक शाळेची हजेरी घेत आहे. प्रत्येक शाळेकडून दररोज ऑनलाईन अहवाल घेतला जात आहे. मात्र दुर्गम खेड्यातील शाळांना हा अहवाल देणे अशक्य होत आहे. तर काही शहरी शाळा जाणीवपूर्वक अहवाल टाळत आहे. ऑनलाईन अहवाल मिळावा यासाठी राज्यस्तरावरून शिक्षकांपर्यंत लिंक पाठविण्यात आल्या आहे. बहुतांश शिक्षक ही लिंक रोज भरतही आहेत. परंतु या रोजच्या अहवालांपासून खुद्द जिल्हास्तरीय यंत्रणाच बाजूला ठेवण्यात आली. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किंवा नगरपालिकांचे शिक्षण प्रशासन अधिकारी असा अहवाल मागविण्यातच येत नसल्याचा दावा करीत आहे. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या दोन हजार ७१८ शाळांपैकी दोन हजार ६२५ शाळा सुरू झाल्या आहे. रोजचा अहवाल मिळत नसला तरी साप्ताहिक अहवाल मात्र गोळा होत आहे. त्यावरुन या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला दहा टक्क्यावर असलेली उपस्थिती आता ५३.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे. 

ऑनलाईन अहवाल देण्यात अडचणी काय ? जिल्ह्यातील ९० टक्के शाळा खेड्यात आहे. त्यामुळे तेथे इंटरनेट उपलब्ध होत नाही. त्यातून दररोज ऑनलाईन अहवाल भरताना शिक्षकांना अडचणी येतात. शिवाय केवळ तीन तासाची शाळा असताना सुरुवातीचा अर्धा तास थर्मल गणने तपासणी, प्रत्येकाच्या तापमानाची नोंद घेणे यातच जातो. त्यानंतर अहवाल भरण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. 

आपल्याला प्रत्येक शाळेचा दररोज अहवाल मागविण्यात आलेला नाही. केवळ शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी राज्य पातळीवरून अहवाल मागविण्यात आला होता. तो प्रत्येक शाळेने भरला आहे. त्यानंतर आपणही शाळांकडून अहवाल मागविलेला नाही. - प्रमोद सूर्यवंशीप्राथमिक शिक्षणाधिकारी.

पालिकेच्या शाळा दररोज भरत आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली आहे. मात्र रोज अहवाल मागविण्याविषयी काहीच सूचना नाहीत. परंतु २७ जानेवारीला पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेने उपस्थिती अहवाल ऑनलाईन भरला आहे. तरीही अधिक खातरजमा केली जाईल. - योगेश डाफप्रशासन अधिकारी, यवतमाळ न.प.

रोज ऑनलाईन अहवाल मागविण्यापेक्षा शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांचा व्हाॅटस्‌अप ग्रुप करून त्यावर केंद्रातील शाळांचा केवळ उपस्थितीचा फोटो मागवावा. केंद्र प्रमुख एकत्रित अहवाल वरिष्ठांना पाठवतील. याबाबत वरिष्ठांनी विचार करावा. - साहेबराव पवारशिक्षक, जिल्हा परिषद शाळा. 

 

टॅग्स :Schoolशाळा