पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:22+5:30

जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे.

Almost farmers for pre-sowing cultivation | पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग

पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग

googlenewsNext
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : कापूस, तूर, चणा मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अद्याप सुरूच आहे. पावसाळ्याला केवळ १० दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीची ओढ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजाने शेतातील कामाला प्राधान्य देत पहाटे पाच वाजल्यापासूनच मशागतीच्या कामाला सुरूवात केल्याचे चित्र आहे.
जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापूस, तूर, चणा घरी पडून आहे. शेतमालाला भाव नाही, सीसीआयची खरेदी नाही, नाफेडची खरेदी संथगतीने सुरू आहे. परिणामी मातीमोल भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नाही. निसर्गाचा लहरीपणा, वादळी पावसाने केलेले नुकसान, अशा शेकडो बाबींनी बेजार असूनही शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे. बैलजोडीची अडचण भासत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने व्ही-पास, वखर, मोगरा आदींचा या मशागतीत समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. बी-बियाणे पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, या चिंतेत शेतकरी असून घरच्याच बियाण्यांना शेतकरी प्राधान्य देत आहे. इकडे कृषी दुकानदाराने बियाणे, खते मे महिन्यात आणली आहे. जून महिन्यातच शेतकºयांची बियाणे खरेदीसाठी धावपळ होते. बहुतांश कृषी केंद्रचालकांनी नवीन बी-बियाणे आणले आहे.

Web Title: Almost farmers for pre-sowing cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती