शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच राजकीय पक्षांमध्ये झाली बंडखोरी

By admin | Updated: September 27, 2014 23:21 IST

प्रचंड अनिश्चिततेच्या सावटात जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक सापडली होती. युती-आघाडी तोडण्यासाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या स्थानिक नेत्यांचेही पितळ शुक्रवारी रात्री उघडे पडले तर काही प्

विधानसभा निवडणूक : स्वहितासाठी प्रबळ दावेदारांना ठेवले बाहेर, तर कुठे ए-बी फॉर्म घेऊन उमेदवारांचा शोधसुरेंद्र राऊत - यवतमाळप्रचंड अनिश्चिततेच्या सावटात जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक सापडली होती. युती-आघाडी तोडण्यासाठी स्वबळाची भाषा करणाऱ्या स्थानिक नेत्यांचेही पितळ शुक्रवारी रात्री उघडे पडले तर काही प्रमुखांनी याही संधीचे सोने करून घेतले. कुठे लाखोंच्या चर्चा होऊन तिकीटावर शिक्कामोर्तब झाला तर कुठे आपल्याच इतर पक्षातील सहकार्यांसाठी शब्द फिरविण्यात आला. रात्रीतून सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी व तडजोड झाली. जिल्ह्याच्या राजकारणात एका रात्रीतून इतक्या नव्या समिकरणांनी आजपर्यंत कधीच जन्म घेतला नाही. सातत्याने उमेदवार कोण ठरणार याचीच उत्सूकता प्रत्येकाला होती. पक्ष कार्यकर्त्यांसह जनसामान्यांचीही उत्सुकता प्रत्येक क्षणी शिगेला पोहचत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ही उत्सुकता जिल्ह्याच्या सातही विधानसभा क्षेत्रात कायम होती. यवतमाळ विधानसभेत शिवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार कोण ठरणार यावर सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेने बाहेरून येणाऱ्या प्रबळ दावेदाराला ऐनवेळी ‘नो-एंट्री’ दाखवत पक्षातील संतोष ढवळे यांना संधी दिली. यात नेत्याने इतर पक्षातील सहकाऱ्यांसाठी मोठा त्याग केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मध्यरात्रीच शिवसेनेचा उमेदवार निश्चित झाला. काँग्रेसचे राहुल ठाकरे हे रात्रीपर्यंत निश्चित होते. मात्र सकाळी १० वाजता उमेदवार बदलल्याची चर्चा रंगली. शेवटी दिल्लीहून आलेल्या फोनने सर्वांना हायसे वाटले. मनसेचा उमेदवार मनाजोगा नसल्याने एका मनसैनिकाने ऐनवेळी बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष नामांकन दाखल केले. यापूर्वीच भाजपातील बाबासाहेब गाडे पाटील आणि राजाभाऊ ठाकरे यांनी अपक्ष नामांकन दाखल करून बंडखोरी केली. मजेशीर बाब म्हणजे राजकीय वर्तुळात दादा असलेल्या घराण्यातील राजेंद्र उत्तमराव पाटील यांनी अपक्ष नामांकन दाखल केले. यावेळी काँग्रेस उमेदवारासोबत आलेले त्यांचे धाकटे बंधू मनीष उत्तमराव पाटील यांची मात्र पंचाईत झाली. याहीपेक्षा मजेशीर बाब आर्णी विधानसभेत घडली. भाजपाकडून उमेदवारीसाठी कालपर्यंत स्पर्धेत असलेल्या माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांना डावलण्यात आले. उमेदवारी जाणार हे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन अर्ज दाखल केला. तर दोन दिवसांपूर्वी सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या विष्णू उकंडे यांनी आपला लढाऊ बाणा दाखवत राष्ट्रवादीच्या घड्याळाला हाताशी धरत नामांकन दाखल केले. उमरखेडमध्ये भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर पांढरे यांनी आपले कमळ फुलणार नाही हे लक्षात येताच विधानसभेसाठी शिवसेनेचा धनुष्य उचलून नामांकन भरले. वणीत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर जाणाऱ्या संजय देरकर यांची मनोकामना आघाडी तोडून राष्ट्रवादीनेच पूर्ण केली. ते आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. पुसद विधानसभेत एका राष्ट्रीय पक्षावर ए-बी फॉर्म घेवून उमेदवार शोधण्याची वेळ आली होती. या कामी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाला लावण्यात आले होते. पुसदमध्ये नीलय नाईकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. परंतू ते मनोहरराव नाईकांच्या व्यासपीठावर दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आग्रह करूनही त्यांनी हाती माईक न घेतल्याने त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले. पुसद, दिग्रस, राळेगाव मतदारसंघ वगळता सर्वच ठिकाणी प्रमुख पक्षातील इच्छुकांकडून बंडखोरी करण्यात आली आहे.