शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम लढविणार सर्व नगरपालिका

By admin | Updated: October 22, 2016 01:35 IST

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी निवडणुका होत असून एमआयएम प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे.

शाज अहमद : असदुद्दीन ओवेसी घेणार यवतमाळात सभायवतमाळ :जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी निवडणुका होत असून एमआयएम प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी नोव्हेंबरमध्ये यवतमाळात जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती एमआयएमचे यवतमाळ अध्यक्ष शाज अहमद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यवतमाळसह उमरखेड, पुसद, वणी, दिग्रस, दारव्हा, घाटंजी, आर्णी या आठही नगरपालिकांसाठी आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलेमिन (एमआयएम) उमेदवार देणार आहे. उमेदवारीसाठी अनेक नावे आली असून अद्याप नावांबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यवतमाळ शहरातील १० प्रभागांमध्ये उमेदवार देण्यात येणार आहेत. त्यातील प्रभाग क्रमांक दोन आणि आठमध्ये दलित उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याचे शाज अहमद म्हणाले. नगरपालिकांच्या निवडणुकांना सामारे जाताना आमचा थेट सामना बसपा आणि काँग्रेससोबतच राहील. त्यादृष्टीने आम्ही मुस्लिम, दलित आणि ओबीसी यांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न करीत आहोत. दलित आणि ओबीसी समाजातील अनेक मान्यवरांनी आमच्यासोबत येण्याचे मान्य केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवार ठरविण्याबाबत महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य सलीम हक पूर्ण लक्ष ठेवून आहेत. उमेदवार निवडीसाठी त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष सैयद मोईन खान ३ नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. यावेळी कळंब चौकात ते सभाही घेणार आहे. यवतमाळ शहरात अजूनही पाणीपुरवठा, रस्त्यांची वाईट अवस्था, घाण, वीजपुरवठा आदी समस्या कायम आहेत. त्यामुळे नगरपालिकेत आमचे सदस्य निवडून आणून या समस्यांवर मात करण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.एमआयएम हा पक्ष विकासाचा मुद्दा घेऊनच लोकांसमोर आलेला आहे. मात्र, काही शक्ती जाणीवपूर्वक या पक्षाला जातीवादी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मुस्लिम समाजातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून त्यांना राजकारणात सक्रीय करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे साहित्यिक एजाज जोश यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला यवतमाळ अध्यक्ष शाज अहमद यांच्यासह साहित्यिक एजाज जोश, नजीर अहमद, एजाज अहमद, मोहम्मद फरहान, हाजी प्यारे साहेब, अकबर शादीक, डॉ. निजाबुद्दीन अन्सारी, इफ्तेकार अहेमद, राजू मलिक, तौफिक खान आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)