शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बॅंक घोटाळ्यातील चारही आरोपींचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कंत्राटीची सेवा संचालक मंडळाने संपुष्टात आणली असून इतर तिघांना निलंबित केले आहे.

ठळक मुद्देएकाला जामीन नाकारला : आर्णी शाखेतील अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या चौघांनीही अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दारव्हा येथील सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सुरुवातीला चौघांनाही अटकेबाबत अंतरिम दिलासा दिला होता. परंतु यातील मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी दारव्हा सत्र न्यायालयाने नाकारला आहे.  जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात चौघांविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार, विश्वासघात व इतरही कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामध्ये महिला व्यवस्थापक, रोखपाल, लेखापाल व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कंत्राटीची सेवा संचालक मंडळाने संपुष्टात आणली असून इतर तिघांना निलंबित केले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्णी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी चारही आरोपींनी दारव्हा येथील सत्र न्यायाधीश रामटेके यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अटक न करण्याबाबत अंतरिम दिलासा दिला होता. परंतु यातील अमोल मुजमुले रा. जवळा ता. आर्णी या लेखपालाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. महिला व्यवस्थापकाच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी घेतली गेली. मात्र त्यावरील निर्णय पुढील तारखेवर दिला जाऊ शकतो.  इतर दोघांच्याही अर्जावर सुनावणी होणार आहे. यातील घोटाळेबाजांना राजकीय आशीर्वाद असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

चौघांच्याही जामिनाला पोलिसांचा तीव्र आक्षेप  न्यायालयाने पोलिसांना ‘से’ मागितला असता चौघांनाही अटकपूर्व जामीन देण्यास तपास अधिकाऱ्याने न्यायालयात तीव्र विरोध दर्शविला.  गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून अनेक बाबींचा तपास करायचा आहे. या घोटाळ्यात आणखी कुणी सहभागी आहे का, रक्कम नेमकी कुठे गेली याचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे चारही आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध दर्शविला. हा विरोध ग्राह्यधरुन अमोल मुजमुले याचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. इतर तिघांबाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी