शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तालुक्याला हवा विकास

By admin | Updated: June 4, 2017 01:12 IST

गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे.

मोठा उद्योग नाही : सिंचनाची व्यवस्था तोकडी, शेतकरी-मजूर सापडले संकटातप्रकाश सातघरे । लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या हातांना काम मिळेनासे झाले आहे. सिंचनाही व्यवस्था तोकडी असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवरही संकट ओढवले आहे. गेल्या ३० वर्षांपूर्वी दिग्रस तालुक्याची निर्मिती झाली. निर्मितीपासूनच हा तालुका विकासात माघारला. तालुक्यात एकही मोठा उद्योग नाही. अनेक लहान उद्योगही नावापुरतेच सुरू आहे. येथील एमआयडीसीचा परिसर भकास पडला आहे. २५ वर्षांपूर्वी येथे एमआयडीसी स्थापना करण्यात आली. मात्र या एमआयडीसीत अद्याप एकही मोठा उद्योग सुरू होऊ शकला नाही. केवळ मोजकेच काही लघु उद्योग सुरु आहे. त्यातूनही बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणे कठीण झाले आहे. एमआयडीसीचा फलक तालुक्यातील बेरोजगारांना वाकुल्या दाखवित आहे. उद्योगांअभावी तालुक्यातील बेरोजगारांना इतरत्र भटकावे लागत आहे. दिग्रस शहरासह तालुक्यातही कुठेच प्रक्रिया उद्योग नाही. सूत गिरणी अथवा एखादा कारखानाही नाही. त्यामुळे तालुक्यातील कामगारांच्या हातांना काम नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे घेतले जाते. मात्र जिनिंग आणि प्रेसिंगशिवाय तालुक्यात अद्याप सूत गिरणीही उभी राहू शकली नाही. जिनिंग प्रेसिंगही सध्या डबघाईस आल्या आहेत. त्यावरील कामगारही बेरोजगार होत आहे. आधीच उद्योग नसल्याने बेरोजगार दिशाहीन झाले आहे. त्यात सुरू असलेले काही लघु उद्योगही बंद पडत असल्याने रोजगाराची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला पुनरूज्जीवित करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहराला लागून अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता प्रचंड आहे. मात्र योग्य धोरण नसल्याने त्यावरून सिंचन करणेही कठीण झाले आहे. सोबतच नियोजनशून्यतेमुळे शहराला पाणी मिळणेही कठीण झाले आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करता येत नाही. जवळपास ७० टक्के शेती कोरडवाहू आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांचेही हाल होत आहे. बेरोजगार, शेतकरी, मजूर सर्वांनाच उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. रस्त्यांची दुरवस्था दिग्रस तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. अनेक गावांचे जोड रस्ते उखडले आहेत. अनेक रस्त्यांचे केवळ गाजावाजा करून भूमिपूजन उरकण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामच सुरू झाले नाही. यापूर्वीचे काही रस्ते आता शेवटच्या घटका मोजत आहे. या रस्त्यांवर सर्वत्र उखडलेली गिट्टी पसरली आहे. रस्त्यांअभावी गावांचा विकासही खुंटला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कामाअभावी बेरोजगारांसह मजुरांनाही परजिल्हा व परप्रांतात स्थलांतरण करावे लागत आहे. क्रीडासंकूल रखडलेकाही वर्षांपूर्वी दिग्रसमध्ये थाटामाटात क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील क्रीडापटूंची निराशा झाली आहे. कबड्डी आणि खो-खोमध्ये राज्याला नामवंत खेळाडू देणाऱ्या तालुक्यात साधे क्रीडा संकूलही पूर्ण झाले नाही. यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात तब्बल ९५२ घरकुलांचे कामही आरोप-प्रत्यारोपांमुळे रेंगाळले आहे.