शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेचे गाळेधारक लिलावातून बाद

By admin | Updated: September 3, 2015 02:04 IST

पोस्टल ग्राऊंडमध्ये बांधलेल्या दुकानांच्या लिलावातून आधीच नगरपरिषदेचे गाळेधारक असलेल्यांना बाद ठरविले जाणार आहे.

पोस्टल ग्राऊंडची दुकाने : डिपॉझिट व भाड्याची रक्कम सामान्य व्यावसायिकांच्या आवाक्याबाहेरयवतमाळ : पोस्टल ग्राऊंडमध्ये बांधलेल्या दुकानांच्या लिलावातून आधीच नगरपरिषदेचे गाळेधारक असलेल्यांना बाद ठरविले जाणार आहे. मात्र या दुकानांच्या डिपॉझिटची रक्कम आणि भाड्याच्या रकमेवर सामान्यांमधून विरोधी सूर उमटत आहे. जिल्हा विकास निधीतून पोस्टल ग्राऊंडवर २६ दुकानांचे बांधकाम करण्यात आले. ही दुकाने तयार झाली. किमान ९० आणि कमाल २६० चौरस फूट क्षेत्रफळाची ही दुकाने आहेत. नगरपरिषदेने शहरात विविध ठिकाणी दुकानगाळे काढले आहेत. हे दुकानगाळे मिळविलेल्या व्यक्तीला पोस्टल ग्राऊंडच्या दुकानांचा लिलाव घेता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगररचना विभागाने बाजार भावानुसार व रेडीरेकनरचा आधार घेऊन या दुकानांचे डिपॉझिट व भाडे निर्धारित केले आहे. किमान साडेचार लाख व कमाल १३ लाख रुपये डिपॉझिट निश्चित केले गेले आहे. ही रक्कम सामान्य व्यावसायिक व महिला बचत गटांच्या आवाक्याबाहेरची आहे. दुकानाचे भाडे मासिक किमान आठ हजार व कमाल २५ हजारांपर्यंत राहणार आहे. हे भाडेही आवाक्याबाहेरच आहे. डिपॉझिट व भाड्याच्या रकमा पाहता ही दुकाने केवळ श्रीमंत व्यापारी वर्गासाठीच बांधली की काय, अशी शंका येऊ लागली आहे. २६ पैकी चार दुकाने अनुक्रमे अनुसूचित जाती, जमाती, महिला व अपंगासाठी आरक्षित आहेत. मात्र त्यांनाही उपरोक्त निर्धारित डिपॉझिट व भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती सापडणे कठीण आहे. कागदोपत्री असा व्यक्ती दाखवून प्रत्यक्षात हे दुकान व्यापाऱ्यांच्या घशात जाण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आत्मामार्फत याच पोस्टल ग्राऊंडवर बचत गटांच्या साहित्याला मार्केट उपलब्ध व्हावे म्हणून २० ते २५ लाख रुपये खर्च करून दोन ते तीन दिवसांचे दरवर्षी प्रदर्शन भरविले जाते. तर दुसरीकडे बचत गटांव्दारे निर्मीत साहित्याला मार्केट मिळावे, या हेतूने उभारलेल्या दुकानांमधून त्यांनाच वंचित ठेवले जात असल्याची विसंगती पाहायला मिळत आहे. मुंबईत अनेक मॉलमध्ये बचत गटांसाठी आरक्षण ठेवले गेले आहे. तोच नियम पोस्टल ग्राऊंडच्या या दुकानांसाठी का नाही, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.या दुकानांच्या परिसरातच आता जिल्हा विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. या दुकानांच्या लिलावाची सध्या तरी कोणतीही प्रक्रिया नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही दुकाने बड्या व्यापाऱ्यांच्याच ताब्यात जाण्याची चिन्हे असून प्रशासनाने धोरण बदलण्याची मागणी होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)