शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

लेखणीला अभिनेता दृश्यरूप देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM

शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत काम करणे मला आवडते आणि इतर भाषेत काम करताना मी वेगळे काहीतरी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो.

ठळक मुद्देसिनेअभिनेता सचिन खेडेकर : वणी येथे पार पडली प्रकट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सामान्य माणूस आपल्या बुद्धीने केवळ एकच आयुष्य जगू शकतो. मात्र लेखकाच्या मनोविश्वाला दृश्यरूप देणे, हे अभिनेत्याचे खरे कार्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर यांनी गुरूवारी येथे केले.शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत काम करणे मला आवडते आणि इतर भाषेत काम करताना मी वेगळे काहीतरी शिकण्याचा सतत प्रयत्न करतो. रियालिटी शोमध्ये पडलेल्या टाळ्या आपल्यासाठी नाही तर अनेक वर्षांपूर्वी हातून घडलेल्या कामाला पडलेल्या असतात. कोणासारखे काम करायचे नाही, हे कळायलाच मला दहा वर्षे लागलीत. नवनवीन माणसांना भेटणे हा अभिनेत्याचा अभ्यास असतो. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाने आपण अनेक पिढ्यांचे नुकसान करतो.रचनात्मक संघर्ष करणारे बाबा आमटे, हिंदीतून मोठेपणा मराठी घेऊन येणारे महेश मांजरेकर, विश्वाच्या विशालतेला आणि जीवनाच्या क्षुद्रतेला दाखवून देणारे महेश एलकुंचवार, स्वत:च्याच भावनांशी खेळणाऱ्या किशोर कदम अशा अनेकांचा आपल्या जीवनावर प्रभाव असल्याचेही सचिन खेडेकर यांनी सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, आशुतोष शेवाळकर, प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे उपस्थित होते. संचालन प्रा.डॉ.अभिजीत अणे यांनी केले.प्रेक्षकांच्या डोळ्यातील प्रेम हाच पुरस्कारनेताजी, आंबेडकर या भूमिका केल्यानंतर माझ्यात राष्ट्रीय चारित्र्य निर्माण झाले. प्रेक्षकांच्या डोळ्यातील प्रेम हाच खरा पुरस्कार असतो, अशा विविध भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडत खेडेकरांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.

टॅग्स :Sachin Khedekarसचिन खेडेकर