शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोन खुनातील आरोपी मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

पॅराेलवर आलेल्या वैभव नाईक याचा निदर्यपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या दोन साथीदारांनाही जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यात ते सुदैवाने बचावले. या गुन्ह्यातील नऊ आरोपी ७ मेच्या रात्रीपासून पसार आहे. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. याशिवाय आरटीओ कार्यालय परिसरात गांजा विक्री होणाऱ्या पानटपरीवर दगडाने ठेचून युवकाचा खून झाला. यातील आरोपींना अटक झाली. मात्र मृतक कोण याची अजूनही ओळख पोलिसांना पटविता आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील खून, चोरी या गंभीर घटनांचा तपासच केला जात नाही. केवळ येथील पोलीस ठाणे व अधिकारी महिन्याचा हिशेब जुळविण्यातच व्यस्त आहे. अवधूतवाडी, शहर, लोहारा या तीनही पोलीस ठाण्यांची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. पोलीस मुख्यालयी असलेल्या पोलीस ठाण्यांमध्येच तपासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. पाटीपुऱ्यातील खुनाच्या घटनेला १३ दिवस झाले आहे. यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. एकच बॅंक दोन वेळा फोडणाऱ्या चोरट्यांचाही सुगावा लागला नाही. पॅराेलवर आलेल्या वैभव नाईक याचा निदर्यपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या दोन साथीदारांनाही जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यात ते सुदैवाने बचावले. या गुन्ह्यातील नऊ आरोपी ७ मेच्या रात्रीपासून पसार आहे. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. याशिवाय आरटीओ कार्यालय परिसरात गांजा विक्री होणाऱ्या पानटपरीवर दगडाने ठेचून युवकाचा खून झाला. यातील आरोपींना अटक झाली. मात्र मृतक कोण याची अजूनही ओळख पोलिसांना पटविता आली नाही. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तर केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम केले जाते. चोरीचा एकही गुन्हा आजतागायत उघडकीस आणला नाही. कर्मचारी नाही, अधिकारी नाही अशी ओरड करीत वेळ मारून नेली जाते. सर्वाधिक गुन्हे दाखल होणाऱ्या पोलीस ठाण्याची तपास यंत्रणा केवळ लाभाच्या गुन्ह्यांवरच लक्ष केंद्रीत करणारी आहे. या ठिकाणी प्रत्येक बाबीचे दर निश्चित झाले आहे. असे गुन्हे सोईस्करपणे उघड होतात. सर्वसामान्यांच्या तक्रारींची मात्र दखल घेतली जात नाही. स्थानिक गुन्हे शाखाही मर्यादितच झाली              आहे. एकीकडे शहरात गंभीर गुन्हे व त्यातील आरोपी पोलिसांना मिळत नाही. तर दुसरीकडे राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहे. लॉजिंगच्या नावाखाली दिवसाढवळ्या कुंटणखाने चालविले जातात. आयपीएल क्रिकेट सट्टा, जुगार, जनावर तस्करी, रेती तस्करी, अवैध दारू विक्री या ना अशा अनेक अवैध धंद्यातून आर्थिक उलाढाल होत आहे. या धंद्यांना संरक्षण देण्याचेच काम सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे चालू देणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. मात्र, त्यांचा हा आदेश यवतमाळ शहरात तरी सर्वांसाठी फायद्याचाच ठरत आहे. हप्ते दुप्पट वाढवून घेतले जात आहे. 

येळाबारातील खूनही अनडिटेक्ट- वडगाव जंगल पोलीस ठाण्यांतर्गत येळाबारा येथील ३५ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याचे प्रेत दगडाला बांधून वाघाडी प्रकल्पात फेकण्यात आले. या गुन्ह्यातीलही आरोपी पोलिसांना मिळालेले नाही. हा खूनसुद्धा अनडिटेक्ट आहे. खुनाचे नेमके कारणही पोलिसांना गवसलेले नाही.

घरफोड्या व चोरींचा हिशेब नाही- अवधूतवाडी व लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोडी व चोरीच्या घटना घडत आहेत. यातील एकही गुन्हा आतापर्यंत उघड झालेला नाही. चोरीच्या गुन्ह्याचा तपासच करायचा नाही, असे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठरवून घेतले की काय असेच चित्र आहे. त्यांना वरिष्ठही या गुन्ह्यांच्या तपासाबाबत विचारणा करताना दिसत नाही. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस