शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

९० हजार हेक्टर जमीन सामूहिक वनहक्कात

By admin | Updated: September 12, 2016 01:16 IST

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्यांच्याच प्रयत्नातून ९० हजार हेक्टर जमिनीवर आदिवासी

३६७ गावे : एक लाख आदिवासी कुटुंबांना मिळणार रोजगाररूपेश उत्तरवार  यवतमाळ वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्यांच्याच प्रयत्नातून ९० हजार हेक्टर जमिनीवर आदिवासी बांधवांच्या मालकीची मोहर उमटली आहे. ३६७ गावांमध्ये सामूहिक वनदाव्यांना महसूल विभागाने मंजुरी दिली असून वनउपजावर आता त्यांचा कायदेशीर हक्क राहणार आहे. यामुळे तब्बल एक लाख कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वन हक्क कायद्यानुसार आदिवासींचा वनावरील हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. वंश परंपरागत जंगल रक्षणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सामूहिक वनदाव्यांची जिल्हाभरातून मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८९३ गावे जंगलालगत वसली आहेत. या गावांना वनहक्क कायद्यानुसार सामूहिक वनदावे सादर करता येणार आहेत. यामुळे जंगलावरील अधिकार या गावाच्या ग्रामसभेला मिळणार आहे. जिल्ह्यातील ३६७ ग्रामपंचायतीचे सामूहिक वनहक्काचे दावे जिल्हा समितीने मंजूर केले आहेत. या गावामधील ग्रामसभेला वनावर संपूर्ण अधिकार देण्याची प्रक्रिया महसूल विभागाने पूर्ण केली आहे. यामुळे वनाचा संपूर्ण अधिकार ग्रामसभेला मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीला वनोपज गोळा करणे आणि त्याचा लिलाव करण्याचा अधिकार मिळाला आहे. जिल्ह्यातील ३६७ गावांमध्ये ९० हजार हेक्टर वनजमीन ग्रामसभेच्या मालकीची झाली आहे. या ठिकाणी पर्यावरणाला हानी न करता निसर्गाचे संवर्धन करीत वनोपज ग्रामसभेला गोळा करता येणार आहे. यामुळे गावातील एक लाख नागरिकांना गावातच रोजगार मिळणार आहे. यामध्ये डिंक, चारोळ्या, बांबू, लाख, तेंदूपत्ता, मध, बेहाडा या वनोपजावर ग्रामसभेला मालकी मिळाली आहे. यासोबतच वनौषधी, तलावातील मत्स्यबिज, शिंगाडे किंवा तलावातील कमळ शेती यासारख्या व्यवसायालाही चालना मिळणार आहे. या उद्योगाचे संवर्धन आणि लिलाव करण्याचा अधिकारी पुढील काळात ग्रामसभेचा राहणार आहे. हे वनोपज गावात विकायचे किंवा मोठ्या शहरात विक्री करायचे त्यावर प्रक्रिया करायची या सर्व बाबीचा अधिकार गावकऱ्यांचा राहणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत जाणारा महसूल ग्रामसभेला मिळणार आहे. यातून गावांचा विकास होणार आहे. जंगलाचे संवर्धन होण्यास मोठा हातभार लागणार आहे. यासोबतच आदिवासींंना हक्काचा रोजगार यातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.