भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:44+5:30

बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६० पोलीस अधिकारी तैनात आहे. गल्लीबोळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे सतत फिरत आहे.

800 police guard in Bhosa area | भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा

भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना रुग्ण आढळल्याने घरोघरी सर्वेक्षण : तीन किलोमीटरचा परिसर सील, दोन ड्रोन कॅमेरांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भोसा रोड परिसरातील एकाच भागात राहणारे आठ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने हा संपूर्ण परिसर सील केला असून तीन किलोमीटर अंतरात कुणालाही एन्ट्री नाही. या ठिकाणी ८०० पोलीस कर्मचारी-अधिकारी २४ तास खडा पहारा देत आहेत. तसेच दोन ड्रोन कॅमेरांद्वारे हालचालींवर नजर ठेवली जात आहे.
शहरातील प्रभाग क्र. १० व २० मध्ये येणाऱ्या परिसरातील इंदिरानगर, पवारपुरा, भोसा रोड, हिंदु स्मशानभुमी परिसर, कोहिनूर सोसायटी, गुलमोहर सोसायटी, शहदाब बाग, रुग्णालय सोसायटी, कापसे ले-आऊट, बिलालनगर, अलमासनगर, नागसेन सोसायटी, सिध्देश्वरनगर समोरचा परिसर, तायडेनगर, अलकबीरनगर, बाबा लेआऊट, फैझनगर, अलहबीब सोसायटी, गुलशननगर तर प्रभाग क्र.२० मधील भोसा गावठाण, गोल्डन पार्क रोड, डेहनकर ले-आऊट भाग १-२, सव्वालाखे ले-आऊट, मंगेशनगर, सुंदरनगर, क्रिसेंट शाळा परिसर, मेमन सोसायटी, मालानी झोपडपट्टी, रुख्मीणीनगर, संजय गांधीनगर, बोरेलेनगर भाग २, तांडा वस्ती, डी.एड. कॉलेज परिसर, शंभरकर ले-आऊट, अंबर लॉन परिसर, सारस्वत ले-आऊट, प्रभातनगर या भागातील केंद्रबिंदूपासून ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या वस्त्यांमधील ३ कि.मी परिघाच्या क्षेत्राची सीमा सील बंद केली आहे.
या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. बुधवारी रात्रीच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासह आरोग्य विभाग, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. तातडीने उपाययोजना करीत गुरुवारी सकाळपासूनच प्रत्येक घरातील व्यक्तीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
येथील बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६० पोलीस अधिकारी तैनात आहे. गल्लीबोळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे सतत फिरत आहे. नियंत्रण कक्षातून तत्काळ परिसरातील पोलिसांना हालचालींची माहिती दिली आहे. कुणीही घराबाहेर पडूच नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तर आशा स्वयंसेविकेला सुरक्षा प्रदान केली आहे.

‘ते’ दिल्ली रिटर्न रुग्ण दोन दिवस होते नेरमध्ये मुक्कामी

नेर : दिल्लीच्या संमेलनातून परत आलेले आणि आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण म्हणून यवतमाळच्या मेडिकलमध्ये दाखल असलेले काही जण नेरमध्ये दोन दिवस मुक्कामी होते. गुरुवारी ही माहिती प्रशासनापुढे येताच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. आठ कोरोना बाधितांपैकी चार जण काही दिवसांपूर्वी नेर येथे दोन दिवस मुक्कामी राहून गेले. या काळात चमननगर परिसरातील ५२ जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या ५२ जणांना क्वारंटाईन केले जाणार आहे. शिवाय रुग्णांनी जेथे मुक्काम ठोकला तो परिसरही सील केला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी गुरुवारी नेर येथे भेट दिली. ५२ जणांना ताब्यात घेऊन क्वारंटाईनची प्रक्रिया सुरू होती. नेर तालुक्यात सुरुवातीला विदेशवारीहून आलेल्या चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र १४ दिवसानंतरही त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना क्वारंटाईनमुक्त करण्यात आले. एकाच शहरातील तब्बल ५२ जण एकाच दिवशी क्वारंटाईन होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

नेर, बाभूळगावमध्ये संशयितांचा शोध
दिल्लीच्या मरकजमधून परतलेल्यांपैकी सात जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या सात जणांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आता प्रशासनाने शोध सुरू केला आहे. तब्बल ४७ जण या रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. त्यांना शोधून क्वारंटाईन करण्यासाठी गुरुवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाºयांनी नेर, बाभूळगाव, सावर परिसराला भेट दिली. दरम्यान गुरुवारी मेडिकल प्रशासनाने ७८ जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले. शिवाय कोरोनाग्रस्तांनी वास्तव्य केलेल्या यवतमाळच्या प्रभाग १० आणि २० मधील तब्बल ३३ हजार नागरिकांचा डोअर-टू-डोअर सर्वे केला जाणार नाही. त्यासाठी कर्मचाºयांच्या ९० चमू फिरत आहे.

मुख्याधिकारी देणार अत्यावश्यक सेवा पास
यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवा पास देण्याचे अधिकार दिले आहेत. शहरातील सील केलेल्या परिसरात जाण्यासाठी या पास राहणार आहे. पासधारकांची यादी संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ उपलब्ध करून द्यावी. पोलिस स्टेशन अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या ठराविक वेळेत परवाना व पासेसधारकांना आवश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंगचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाºयांकडून केली जाणार आहे.

Web Title: 800 police guard in Bhosa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.