दोन महिन्यात ५७ टक्के ‘बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:25+5:30

जून महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनच्या पावसात ३२ टक्के तूट होती. जुलैमध्ये मासिक सरासरीच्या अधिक पाऊस झाला. जून आणि जुलैमधील मासिक सरासरी १०३ टक्क्यांवर पोहचली . हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. तसाच तणाचीही वाढ करणारा आहे. यामुळे तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी केलेली फवारणी व्यर्थ ठरली आहे. प्रारंभी काहीकाळ तणाची वाढ थांबली.

57% 'rain' in two months | दोन महिन्यात ५७ टक्के ‘बरसात’

दोन महिन्यात ५७ टक्के ‘बरसात’

googlenewsNext
ठळक मुद्देतणनाशक ठरले निकामी : शेतात मजूर तुटवडा, जून-जुलैच्या पावसाची मासिक सरासरी गाठली

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मागील दोन महिन्यात मासिक सरासरीच्या १०३ टक्के पाऊस झाला, तर वार्षिक सरासरी ५७ टक्के गाठली आहे. सततच्या पावसाने शेतातील तणनाशकाचा प्रयोग निकामी ठरला आहे. निंदणासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतात पीक आणि तणामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. तणांचा पिकांना फटका बसत आहे.
जून महिन्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनच्या पावसात ३२ टक्के तूट होती. जुलैमध्ये मासिक सरासरीच्या अधिक पाऊस झाला. जून आणि जुलैमधील मासिक सरासरी १०३ टक्क्यांवर पोहचली .
हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. तसाच तणाचीही वाढ करणारा आहे. यामुळे तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी केलेली फवारणी व्यर्थ ठरली आहे. प्रारंभी काहीकाळ तणाची वाढ थांबली. नंतर मात्र तण जोमाने वाढून पिकांच्या वर गेले आहे. आता शेतशिवारात पीक आणि तण बरोबरीणे वाढले आहे. यामुळे किडीचा प्रकोप वाढून उत्पादन घटण्याचा मोठा धोका आहे.
तणनाषकांचा खर्च निंदनाच्या तुलनेत कमी येतो. यामुळे सर्वच शेतकºयांनी तणनाषकाची फवारणी केली. तणनाषकाचा प्रभाव झाला नसल्याने शेतकऱ्यावर निंदणाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. याची क्षमता प्रत्येक शेतकºयांमध्ये नाही. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. निंदणाकरिता लागणाऱ्या पैशासाठी शेतकरी सावकाराकडे येरझारा मारत आहे. जिल्ह्यात मजुरांचाही तुटवडा आहे. यातून स्थिती अधिकच बिकट झाली आहे.


पिकांची वाढ, फुलांची संख्या कमी
सततच्या पावसाने पिकांची जोमाने वाढ होत आहे. ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फवारणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पिकांची उंची वाढल्याने शाखीय वाढ थांबली आहे. परिणामी फुलांची संख्या घटली आहे. याचा फटका उत्पादनाला बसण्याचा धोका आहे.

Web Title: 57% 'rain' in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस