चोरीतील ४५ फ्रीज विकणारा साक्षीदार

By Admin | Updated: September 29, 2014 23:11 IST2014-09-29T23:11:42+5:302014-09-29T23:11:42+5:30

नोकरानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामातील महागड्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची चोरी करून त्याची अल्पकिंमतीत विक्री केली. चोरीतील लाखोंच्या वस्तू खरेदी करणाऱ्या चार जणांना रविवारी

45 Freeze Selling Witness | चोरीतील ४५ फ्रीज विकणारा साक्षीदार

चोरीतील ४५ फ्रीज विकणारा साक्षीदार

उलाढाल झाल्याची ओरड : प्रतिष्ठानातील चोरीचे प्रकरण
यवतमाळ : नोकरानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामातील महागड्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूची चोरी करून त्याची अल्पकिंमतीत विक्री केली. चोरीतील लाखोंच्या वस्तू खरेदी करणाऱ्या चार जणांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता सर्वांनाच साक्षीदार बनविण्यात आले. विशेष असे की, चोरीतील ४५ फ्रीज आपल्या एन्टरप्राईजेसमधून विकणाऱ्या एका व्यापाऱ्यालाही पोलिसांनी साक्षीदार बनवून कळसच गाठल्याचे दिसून येत आहे.
शहरातील एका प्रतिष्ठित प्रतिष्ठानामध्ये ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यातूनच त्याची प्रत्येक दिवशी व्यवसायातून लाखोंची उलाढाल होते. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत काही नोकरांनी गोदामातून या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टप्याटप्प्याने लंपास केल्या. त्यामध्ये फ्रीज, टीव्ही, एलईडी आदी वस्तूंचा समावेश आहे. ही बाब नुकतीच संबंधित व्यावसायिकाच्या लक्षात आली. त्याने या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. तसेच संशयित व्यक्तींची माहितीही पोलिसांना दिली. त्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांंना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गोदामातून आॅर्डरच्या वस्तूंसोबत लाखोंच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लंपास केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. तसेच माल खरेदी करणाऱ्या चार व्यक्तींची नावेही पोलिसांपुढे उघड केली. त्या चारही जणांना रविवारी दुपारीच शहर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीही चोरीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. वास्तविक चोरीतील मालखरेदी करणाऱ्या व्यक्तींना आरोपी बनविणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता चारही खरेदीदारांना साक्षीदार बनविले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 45 Freeze Selling Witness