शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६७ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे.

ठळक मुद्देलाडू, दुध, अंडी बंद : आहाराचे प्रमाण वरिष्ठ स्तरावरून घटले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढला, तसा कुपोषित बालकांना तंदुरूस्त करण्यासाठी दिला जाणारा सकस आहार कमी करण्यात आला. ग्रामीण भागात तर लाडू, दुध, अंडी थांबविण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील ३६७ कुपोषित बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका आहे.कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. पूर्वी शिजवून दिला जाणार आहार बंद झाला. त्याऐवजी घरपोच धान्य पुरविण्याचे आदेश आहे. मात्र शहरी भागात हा नियम पायदळी तुडविण्यात आला आहे. कार्यक्षेत्र मोठे असल्याच्या कारणाने अंगणवाडीताई लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवितात. तेथे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असताना शहरी भागात अंगणवाडीताई सुरक्षेच्या उपाय योजना राबविताना अपुऱ्या पडत आहेत.कुपोषण भरून निघावे म्हणून दुध, अंडी आणि केळी दिली जात होती. शेंगदाण्याचे लाडू आणि पोटभर आहारासोबत डब्यातही आहार दिला जात होता. मात्र हा आहार आता बंद झाला आहे. कुपोषणग्रस्त लाभार्थ्यांच्या धान्यात कपात करण्यात आली. सुदृढ बालक आणि कुपोषित बालकामध्ये धान्य वितरणात मोठी तफावत आहे. कुपोषित बालकाला अधिक धान्य गरजेचे आहे. असे असले तरी त्यांना कमी धान्य देण्याचे कारण काय असावे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. यामुळे पालक अंगणवाडीताईला जाब विचारतात. मात्र आहाराचे प्रमाण वरिष्ठ स्तरावरून ठरल्याचे सांगण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही.अशी आहे धान्य वितरणातील तफावतसुदृढ बालकगहू ३ किलो १०० ग्रॅम, मटकी १ किलो ३०० ग्रॅम, मुग १ किलो ३०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, तिखट २०० ग्रॅम, मिठ ४०० ग्रॅम.कुपोषित बालककुपोषित बालकाला २२५० ग्रॅम गहू, चवळी ७५० ग्रॅम, मसूर ७५० ग्रॅम, तेल ५०० ग्रॅम, मीठ ३०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मिरची १०० ग्रॅम.३५ रुपयांची मदतकेंद्र शासनाने गरोदर मातांना ग्रामीण भागात थेट निधी देण्याची घोषणा केली आहे. मध्यंतरी त्यांना आहार मिळाला नाही. आता दीड महिन्यानंतर त्यांच्या खात्यात ३५ रुपये दरदिवस प्रमाणे निधी गोळा होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य