शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३२ लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायपासवरील वे ब्रिजजवळ पकडण्यात आला. ट्रकमध्ये दर्शनी भागाला तांदूळ ठेवला होता. परंतु आत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला.

ठळक मुद्देकर्नाटकातून यवतमाळमार्गे कारंजात : तिघांवर गुन्हा, तांदळाच्या आडोशाने तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तांदळाच्या आडोशाने कर्नाटकातून यवतमाळ मार्गे वाशिमकडे जाणारा ३२ लाख रुपये किंमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू स्थानिक पोलिसांनी बायपासवर पकडला. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोघांना ताब्यात घेतले गेले.स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायपासवरील वे ब्रिजजवळ पकडण्यात आला. ट्रकमध्ये दर्शनी भागाला तांदूळ ठेवला होता. परंतु आत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला. हा माल वाशिम जिल्ह्याच्या कारंजामधील जाफर अली याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून जाफर अलीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला. ट्रकचालक सनवर खान सलाउद्दीन खान (२४) व अब्दुल मुक्तार समी (२०) दोघेही रा.बिदर (कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर, एपीआय मिलन कोयल, प्रमोद पाचकवडे, विनोद चव्हाण, पीएसआय मंगेश भोयर, सचिन पवार, जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय पवन राठोड, योगेश गटलेवार, बंडू डांगे, हरीश राऊत, महेश पांडे, सुधीर पिदूरकर, मधुसूदन रणखांब यांनी केली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोपाल माहुरे, संदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.१५ कोटींच्या सुगंधित तंबाखूचे काय ?भोसा रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामात लॉकडाऊन काळात १५ कोटी रुपयांच्या सुगंधित तंबाखूचा साठा करण्यात आला होता. एरिया सील केल्याने हा तंबाखू बाहेर काढणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने या संबंधी वृत्त प्रकाशित केले. या प्रकरणाची चौकशी नियंत्रण कक्षातील एका पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली. मात्र या चौकशीचे पुढे काय झाले याचा थांगपत्ता नाही. आपल्याला दुसरीकडेच गुंतविले असे म्हणून हा अधिकारी हात वर करतो आहे. ही गोदामे शहरातील तंबाखू व्यापाऱ्याची आहेत. आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटी परिसरापर्यंत त्याची विक्री होत असल्याचे सांगितले जाते. इतर विविध चौकशांप्रमाणे १५ कोटींच्या सुगंधित तंबाखूची ही चौकशीही दडपली गेली असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी