शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे १९१ कोटी मंजूर

By admin | Updated: June 2, 2016 00:06 IST

अगदी खरीप हंगामाच्या तोंडावर हवामानावर आधारित आणि राष्ट्रीय पीक विमा योजनेचे जिल्ह्याला १९१ कोटी मंजूर झाले आहे.

३ लाख ३९ हजार शेतकरी : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा यवतमाळ : अगदी खरीप हंगामाच्या तोंडावर हवामानावर आधारित आणि राष्ट्रीय पीक विमा योजनेचे जिल्ह्याला १९१ कोटी मंजूर झाले आहे. ही रक्कम पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज बँकांनी वर्तविला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा आणि राष्ट्रीय पीक विमा असा दोन प्रकारचा विमा उतरविला होता. पीक विम्याची मदत तत्काळ घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. यामधील हवामानावर आधारित पीक विमा योजनेची मदत यापूर्वीच जाहीर झाली होती. परंतु राष्ट्रीय पीक विमा योजनेची मदत जाहीर व्हायची होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. पेरणी कशी करावी, अशी चिंता त्यांना सतावत होती. आता राष्ट्रीय पीक विमा कंपनीने ही मदत जाहीर केली असून राज्याला चार हजार कोटी रुपये मिळणार आहे. त्यातील यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ६४ शेतकऱ्यांना ११७ कोटी ५९ लाख रुपये मदत मिळणार आहे. तर यापूर्वी जाहीर झालेल्या पीक विमा योजनेतून १ लाख ३७ हजार ६६४ शेतकऱ्यांना ७३ कोटी ४४ लाख रुपये विम्यापोटी मिळणार आहे. या दोनही विम्यातून जिल्ह्यातील ३ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना तब्बल १९१ कोटी रुपये मिळणार आहे. मात्र हवामानावर आधारित पीक विम्याची रक्कम कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली होती. यानंतर बँकांना विम्याची रक्कम वळती न करण्याची सूचना आली आहे. त्यामुळे या योजनेतूनही शेतकऱ्यांना पैसे लवकरच मिळणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशा सर्वच पिकांना ही मदत जाहीर झाली आहे. कापूस पिकाला सर्वात कमी मदत आहे. तर सोयाबीनसह इतर पिकांची उत्पादकता कमी असल्याने या पिकांना सर्वाधिक मदत जाहीर झाली आहे. मिळालेली मदत कर्जाच्या खात्यात वळती करू नये अशा सूचना बँकांना आहे. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर काही अंशी शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. (शहर वार्ताहर) विमा न उतरविणाऱ्या ६० हजार शेतकऱ्यांचा अहवाल मागविला विविध कारणांनी जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाच नाही. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले. परंतु विमा न काढल्याने आपल्याला मदत मिळेल की नाही, अशी शंका होती. परंतु आता शासनाने विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याचे धोरण जाहीर केले. त्यामुळे दुष्काळी स्थितीत विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला मिळाल्या आहे. या शेतकऱ्यांचा शोध घेण्याचे काम तलाठी गावपातळीवर करीत आहे. या शेतकऱ्यांना लवकरच राज्य शासन मदत घोषित करणार असल्याची माहिती आहे.