१९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय !

By Admin | Updated: May 13, 2016 02:39 IST2016-05-13T02:39:39+5:302016-05-13T02:39:39+5:30

जाळपोळ करून नुकसान केल्याप्रकरणातील आरोपी तब्बल १९ वर्षांपासून फरार आहे.

The 19-year-old accused absconded in the forest! | १९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय !

१९ वर्षांपासून फरार आरोपी जंगलात तेंदूपत्ता वेचतोय !

पाचगणीत आश्रय : मृत्यूची चर्चा ‘एलसीबी’ने खोटी ठरविली
यवतमाळ : जाळपोळ करून नुकसान केल्याप्रकरणातील आरोपी तब्बल १९ वर्षांपासून फरार आहे. तो जिल्ह्यातच तेंदूपत्ता मजूर म्हणून काम करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने त्याला अटक केली.
विठ्ठल देवसिंग पवार (५८) रा. माळेगाव पोलीस ठाणे पारवा, असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पारवा पोलीस ठाण्यात भादंवि ४३५ कलमाखाली सन १९९७ मध्ये (अपराध नं. ४८/९७) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यान तो मरणपावल्याचीही चर्चा माळेगाव परिसरात होती. अनेक वर्ष कुटुंबियांनाही त्याचा थांगपत्ता नव्हता. तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरनजीकच्या पाचगणी येथे वास्तव्याला होता. महिनाभरापूर्वी तो झरी तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटली बोरगाव येथे काकासोबत तेंदूपत्त्याच्या कामावर रुजू झाला. त्याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार साहेबराव राठोड, पोलीस शिपाई वासू साठवणे, संदीप मेहेत्रे यांच्या पथकाने १९ वर्षांपासून फरार विठ्ठल पवारला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने पाहिजे-फरारी असलेल्या आरोपींच्या शोधार्थ धडक मोहीम हाती घेतली आहे. विठ्ठलची १९ वर्षानंतर झालेली अटक हे या मोहिमेचे फलित मानले जात आहे.

Web Title: The 19-year-old accused absconded in the forest!