शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार रूग्णांनी घेतला जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: September 2, 2015 04:05 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील १४ हजार १६८ रूग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे.

यवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील १४ हजार १६८ रूग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये ३ हजार २८३ तर १० हजार ८८५ रूग्णांनी राज्यातील इतर अंगीकृत रूग्णालयांमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहे. दिवसेंदिवस रूग्णांचा या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात नऊ रूग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जात आहे. यामध्ये यवतमाळ येथील सहा तर पुसद येथील दोन व वणी येथील एका रूग्णालयाचा समावेश आहे. यवतमाळ येथील पाचशे खाटांची सोय असलेल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयासह हिराचंद मुणोत मेमोरीअल क्रिटीकेअर हॉस्पिटल (१०० खाटा), साईश्रद्धा मल्टीस्पेशालिटी रूग्णालय (३० खाटा), तावडे रूग्णालय (५० खाटा), राठोड हॉस्पिटल शिशू रूग्णालय (३१ खाटा) व शांती आॅर्थाेपेडीक रूग्णालय (२५ खाटा) आदींचा समावेश आहे. पुसद येथील क्रिष्णा बाल रूग्णालय (३० खाटा) व लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी रूग्णालय (१०० खाटा) तसेच वणी येथील सुगम रूग्णालय (१०० खाटा) या रूग्णालयांचा योजनेत समावेश आहे. जिल्ह्यातील या नऊ संलग्नित रूग्णालयातच जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रूग्णांना मिळू शकतो. या सर्व रूग्णालयांमध्ये योजनेतील पात्र रूग्णांना खाटा, निदान सेवा, भुल तज्ज्ञसेवा, शस्त्रक्रिया, औषधोपचार, भोजन व एक वेळेसचा परतीचा प्रवास खर्च या सर्व सुविधा कोणत्याही शुल्काशिवाय दिल्या जातात. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यवतमाळ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व १२१ प्रकारच्या आजारांचा पाठपुरावा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत लाभार्थी रूग्णांना दीड लाख रूपयांपर्यंत विमा संरक्षण आणि मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लाख ५० हजारापर्यंतचा लाभ समाविष्ठ आहे. (प्रतिनिधी)योजनेचा लाभ कुणाला?४राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने काही निकष ठरविले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी सबंधीत लाभार्थी रूग्णाजवळ पिवळे/केशरी/अन्नपुर्णा/अंत्योदय शिधापत्रिका व शासनमान्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यात नऊ रूग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. या सर्व रूग्णालयांमध्ये आरोग्य मित्र रूग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. रूग्णांनी माहिती व मदतीसाठी या आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.