शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह विकासासाठी १२ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

यवतमाळचे कारागृह दोन हेक्टरमध्ये आहे. या कारागृहाची क्षमता २०८ कैद्यांची आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. यामुळे सुविधा अपुऱ्या पडतात. खास करून महिलांच्या बराकींमध्ये उपाययोजनांची गरज आहे. नाविन्यपूर्ण योजनेमधून महिला बराकी दुरूस्तीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनूतनीकरण होणार । महिलांसाठी स्वतंत्र बराक

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील ब्रिटिशकालीन कारागृहात दुरूस्त्या करण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतून १२ कोटी रूपये मंजूर केले आहेत. कारागृहाच्या सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारले जाणार आहे. यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र बराक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने नव्याने उभारले जाणार आहे.यवतमाळचे कारागृह दोन हेक्टरमध्ये आहे. या कारागृहाची क्षमता २०८ कैद्यांची आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. यामुळे सुविधा अपुऱ्या पडतात. खास करून महिलांच्या बराकींमध्ये उपाययोजनांची गरज आहे. नाविन्यपूर्ण योजनेमधून महिला बराकी दुरूस्तीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.यासोबतच कारागृहातील रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, कैद्यांची संख्या अधिक असल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन टाकी, वाढीव स्वयंपाकघर यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक बराकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची संख्या वाढविली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अतिशय जुनी आहेत. मध्यंतरी यावरचे टिन उडाले होते. जागाही अपुरी आहे. क्वार्टरची दुरूस्ती होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.वॉच टॉवरवरून कारागृहावर नजरसीसीटीव्ही कॅमेरासोबत वॉच टॉवरच्या माध्यमातून कारागृहावर पाळत ठेवली जाणार आहे. एका कर्मचाºयाची नियुक्ती राहणार आहे. या ठिकाणावरून कारागृहाच्या आत आणि बाहेरील भागात २४ तास तगडी सुरक्षा राहणार आहे.कारागृहात गत अनेक वर्षांपासून काही बाबींमध्ये दुरूस्ती करणे गरजेचे होते. यामुळे कारागृह प्रशासनाने दुरूस्तीचा प्रस्ताव आणि नवीन उपाय योजनांची सूचना केली. त्यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा नियोजन विभागाकडे आराखडा सादर करण्यात आला होता. आराखड्यातील उपाय योजनामुळे कारागृहाची सुरक्षितता वाढेल.- कीर्ती चिंतामणीकारागृह अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :jailतुरुंग