शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

निवृत्त मुख्याध्यापकाकडे ११ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM

गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र पहायला मिळाले. चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. त्याने बेडरुमच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश घेतला. तेथे असलेले कपाट फोडले.

ठळक मुद्देसत्यनारायण ले-आऊट : नवविवाहितेचे २७० ग्रॅम सोने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरफोड्यांचे कॅपिटल म्हणून यवतमाळ शहराची ओळख बनली आहे. बाजारात काही तासाच्या खरेदीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडण्याची सोय राहिली नाही. अत्यंत वर्दळीच्या आर्णी मार्गावरील सत्यनारायण ले-आऊटमध्ये रविवारी तब्बल ११ लाखांची घरफोडी झाली. विशेष म्हणजे या घरी दहा दिवसापूर्वीच मुलाचा विवाह सोहळा पार पडला होता.गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र पहायला मिळाले. चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. त्याने बेडरुमच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश घेतला. तेथे असलेले कपाट फोडले. नंतर वरच्या मजल्यावर असलेले कपाट फोडले. इतकेच नव्हे तर घरातील लाकडी कपाटही फुटलेले दिसले. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. या चोरट्याने घरात प्रवेश करताना किचनच्या बाहेरुन ठेऊन असलेल्या कुदळीच्या सहाय्याने खिडकीचे ग्रील तोडले. हे दृश्य पाहून काही वेळ जाधव कुटुंबियांना जबर हादराच बसला. नंतर त्यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. ठाणेदार आनंद वागतकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञही तेथे आले. श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र ते तेथेच घुटमळले. ठसे तज्ज्ञांना काही ठोस हाती लागले नाही. या चोरट्याने २७० ग्रॅम सोने व ८० हजार रुपये रोख रक्कम असा ११ लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गणेश जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.दहा दिवसांपूर्वीच झाला मुलाचा विवाहगणेश जाधव यांच्या मुलाचा २० नोव्हेंबरला विवाह झाला. नववधू व मुलाचे दागिने घरात ठेवलेले होते. चोरट्यांनी याच दागिन्यांवर हात साफ केला. तब्बल २७० ग्रॅम सोने त्यांच्या हाती लागले. इतकेच नव्हे तर या दागिन्यांची बिले चोरट्यांनी सोबत नेली आहेत. त्यामुळे पोलिसात तक्रार करताना जाधव यांच्याकडे दाखविण्यासाठीसुद्धा बिले उपलब्ध नाही.चोरट्याने बेन्टेक्स व गोल्ड कव्हरींग दागिने फेकलेचोरट्याने ज्या पद्धतीने हा गुन्हा केला. यावरून तो सराईत असल्याचे स्पष्ट होते. दागिन्यांचा डबा हाती लागला तेव्हा त्याने बेन्टेक्स आणि १ ग्रॅम गोल्ड कव्हरींग असलेले दागिने तिथेच फेकून दिले. फक्त सोन्याचेच दागिने त्याने घेतले. यावरून चोरटा सराईत असल्याचे दिसून येते. त्याने घरात खिडकीचे ग्रील तोडून प्रवेश केला. मात्र जाताना घराच्या मागचे दार उघडून निघून गेला. यावरून चोरी झाल्याची घटना शेजाऱ्यांच्या लक्षातच आली नाही.‘लोकमत’चे वृत्त ठरले खरेयवतमाळ शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या दोन टोळ्या सक्रिय आहेत. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत याचा सविस्तर वृत्तांत ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात दिला आहे. अगदी त्याच पद्धतीने सत्यनारायण ले-आऊटमध्ये घरफोडी झाली आहे. इतरही ठिकाणी होणाºया घरफोड्यांची पद्धत जवळपास मिळती जुळती आहे. पोलिसांनी त्यावरही लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Thiefचोर