जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:25+5:30

या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या दबावात ही नावे हटविण्यात आल्याचा सूरही भाजपच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे.

1045 voters in the final list of District Bank | जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार

जिल्हा बँकेच्या अंतिम यादीत १०४५ मतदार

Next
ठळक मुद्देदोनशे नावांवर आक्षेप : अनेक नावे हटविली, उच्च न्यायालयात आव्हान देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २६ मार्च रोजी संचालकांच्या २१ जागेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक हजार ४५ मतदारांची अंतिम यादी शनिवारी रात्री उशिरा अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जारी केली.
या मतदार यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतदारांच्या अंतरिम यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले. त्यातील काही स्वीकारले तर काही फेटाळले गेले. या आक्षेपाच्या अनुषंगाने कित्येक नावे मतदार यादीतून हटविण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या दबावात ही नावे हटविण्यात आल्याचा सूरही भाजपच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे. सक्षम कारण नसताना यादीतून नावे हटविण्याच्या विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला सोमवारी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही कित्येकाने चालविली आहे. जिल्हा गटातील मतदारांचा आकडा ७०२ दिसत असला तरी त्यातील अनेक मयत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरम नसताना सभा घेणे, अवसायनात असणे, थकबाकीदार असणे अशा कारणांवरून नावे यादीतून बाद करण्यात आली.
मतदार यादीही आता कोर्टकचेरीत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधीच सहनिबंधक, सहकार मंत्री, उच्च न्यायालय येथे विविध याचिका व त्यावरील निर्णय येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हा बँक संचालक निवडणुकीचा नेमका फॉर्म्युला काय राहील, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु या आठवड्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जाते.

अंतिम मतदार यादी जारी करण्यात आली आहे. विविध प्रलंबित याचिकांवरील निर्णय आठवडाभरात येण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्व संभ्रम दूर होण्यास मदत होईल. मतदार यादीवर दोनशे पेक्षा अधिक आक्षेप नोंदविले गेले होते.
- राजेश दाभेराव
विभागीय सहनिबंधक तथा सहकारी प्राधिकृत अधिकारी (सहकारी संस्था), यवतमाळ.

Web Title: 1045 voters in the final list of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक