ऐश्वर्या रायसाठी WWE सुपर स्टार जॉन सीनाची 'स्पेशल' पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 12:11 IST2020-07-19T12:11:24+5:302020-07-19T12:11:57+5:30

जॉन सीना सोशल मीडियावर नेहमी बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी पोस्ट करत असतो

John Cena shares post featuring Aishwarya Rai Bachchan after actress is admitted to hospital | ऐश्वर्या रायसाठी WWE सुपर स्टार जॉन सीनाची 'स्पेशल' पोस्ट!

ऐश्वर्या रायसाठी WWE सुपर स्टार जॉन सीनाची 'स्पेशल' पोस्ट!

बिग बी अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली. सध्या दोघांवरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती, तर ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, ऐश्वर्यालाही आता नानावटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. WWE सुपर स्टार जॉन सीना यानं सोशल मीडियावर ऐश्वर्यासाठी स्पेशल मॅसेज पोस्ट केला आहे.

जॉन सीना सोशल मीडियावर नेहमी बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी पोस्ट करत असतो. यापूर्वी त्यानं ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनानंतर इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो पोस्ट करून श्रंद्घांजली वाहिली होती. आता माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर जॉन सीनानं तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन सीनानं यापूर्वी अमिताभ आणि अभिषेक यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठीही पोस्ट केली होती.  


पीटीआयच्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबीयातील सदस्यांची प्रकृती सुधारत आहे. अमिताभ यांनीही ट्विट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. 


 

Web Title: John Cena shares post featuring Aishwarya Rai Bachchan after actress is admitted to hospital