Next

भुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:21 PM2018-05-25T17:21:44+5:302018-05-25T17:23:56+5:30

वाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात ...

वाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.