Ganesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 14:21 IST2018-09-23T12:43:52+5:302018-09-23T14:21:04+5:30
शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे.
नाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल बडविला. विविध ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. सर्व धर्मियांचे धर्मगुरू मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन , महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.